भरदिवसा घरफोडी : पावणेदोन लाखांचा मुद्देमाल लंपास !

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 8 सप्टेंबर 2021 :-  प्रसुतीसाठी माहेरी असलेल्या महिलेचे घरात असलेले दागिने व रोख रक्कम असा तब्बल पावणेदोन लाखांचा मुद्देमालअज्ञात चोरट्यांनी भरदिवसा कुलूप तोडून लंपास केला आहे.

ही घटना जामखेड तालुक्यातील पिंपरखेड या ठिकाणी घडली आहे. याप्रकरणी विठ्ठल ज्ञानदेव शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जामखेड पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, जामखेड तालुक्यातील पिंपरखेड शिवारातील शिंदे वस्ती येथे फिर्यादी विठ्ठल ज्ञानदेव शिंदे हे राहतात. दरम्यान त्यांची मुलगी प्रसुतीसाठी माहेरी आली होती.

जामखेड शहरातील एका हाॅस्पिटलमध्ये प्रसुती झाल्याने मी व माझा मुलगा तीला भेटण्यासाठी गेलो होतो. भेटून आल्यानंतर घरातील आस्ताव्यस्त पडलेले सामान व कपाटाचे तुटलेले लाॅकर पाहिल्यानंतर चोरीचा प्रकार लक्षात आल्यानंतर शिंदे यांनी पोलीस स्टेशनला संपर्क केला.

या नुसार घरातील कपाटात ठेवलेले सोन्याचे गंठण, मिनी गंठण, कानातील फुले व आंगठी असा १ लाख ७० रुपये किमतीचा सोन्याचा ऐवज कोणी तरी अज्ञात चोरटय़ाने चोरून नेला. याबाबत विठ्ठल ज्ञानदेव शिंदे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe