Business Idea : भरघोस कमाई करून देणारे व्यवसाय, कमी गुंतवणुकीत होईल जबरदस्त फायदा, जाणून घ्या

Ahmednagarlive24 office
Published:
Business Idea

Business Idea : सध्या असे अनेक व्यवसाय आहेत जे तुम्हाला जास्तीत जास्त परतावा मिळवून देतात. विशेष म्हणजे अनेकजण नोकरी सोडून व्यवसाय सुरु करतात. जर तुम्ही देखील हा व्यवसाय सुरु करून लाखो रुपयांची कमाई करू शकता.

समजा जर तुमच्याकडे तुमचा स्वतःचा व्यवसाय सुरु करण्यासाठी पैसे नसतील तर काळजी करू नका. तुम्ही आता केंद्र सरकारच्या मदतीने व्यवसाय सुरु करू शकता. सध्या असे व्यवसाय आहेत, ज्यातून तुम्हाला चांगला फायदा होईल.

चाट कॉर्नर व्यवसाय

सध्या चाट आणि मोमोजमध्ये काम करणारे लाखोंची कमाई करत आहेत. ज्यामुळे तुम्हाला कमी खर्चात असा व्यवसाय सुरू करायचा असल्यास तुम्ही मोजक्या कारागिरांसह हा व्यवसाय चालू करता येईल. जर तुम्ही चांगल्या दर्जाचे आणि स्वच्छतेने उत्तम चवीचे खाद्यपदार्थ विकत असल्यास हा व्यवसाय तुम्हाला कमी वेळात चांगला नफा मिळवू शकता.

सुरु करा हस्तनिर्मित वस्तू व्यवसाय

समजा तुम्हाला कलेची आवड असेल तर हा व्यवसाय तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. महत्त्वाचे म्हणजे यासाठी तुम्ही फक्त पेंटिंग किंवा तत्सम वस्तू बनवून विकल्या पाहिजेत असे काही नाही. आता तुम्ही पडदे, ज्यूटच्या पिशव्या, अगरबत्ती, हाताने बनवलेल्या इतर कोणत्याही वस्तू तुम्ही घरबसल्या तयार करून त्या बाजारात सहज विकू शकता. सध्या अशा गोष्टींची मागणी वाढली असून हा व्यवसाय तुम्हाला चांगला नफा मिळवून देईल.

पिठाची गिरणी व्यवसाय

पूर्वी पिठाच्या गिरण्यांसमोर धान्याची भांडी घेऊन लोकांच्या लांबच लांब रांगा लागल्या असल्याचे आपल्याला पाहायला मिळायचे. परंतु पॅकेज्ड पिठाची बाजारपेठ झपाट्याने विस्तारत आहे त्यामुळे पिठाच्या गिरण्यांवरील मागणी कमी झाली होती. सध्या लोकांमध्ये त्यांच्या आरोग्याविषयी जागरुकता वाढली असून पिठाच्या गिरणीची मागणी पुन्हा वाढली आहे. त्यामुळे तुम्ही पिठाची गिरणी सुरू करून तुमचा छोटासा व्यवसाय चालू करू शकता.

सलून व्यवसाय

जर तुमची इच्छा असल्यास तर तुम्ही सलूनचे छोटे दुकान उघडूनही तुमचा व्यवसाय चालू करू शकता. यासाठी तुम्हाला जास्त पैशांचीही गरज नसणार आहे. हा व्यवसाय चालू करण्यासाठी तुम्हाला एक दुकान आणि काही वस्तू लागणार आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe