Business Idea : शेती सोबत करा ‘हे’ 3 व्यवसाय, नाही भासणार पैशांची चणचण

Ahmednagarlive24 office
Published:
Business Idea

Business Idea : शेती ही निसर्गावर अवलंबून आहेच परंतु अनेक नैसर्गिक आपत्तींचा देखील खूप विपरीत परिणाम शेतीवर होत असतो. गेल्या दोन ते तीन वर्षापासून आपण सगळेजण पाहत आहोत की शेती व्यवसायावर अवकाळी पाऊस,

अतिवृष्टी तसेच गारपिटी सारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे खूप मोठे नुकसान होत असून शेतकऱ्यांना खूप मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर शेतीवर अवलंबून राहणे तितकेसे फायद्याचे नाही.

नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना कायमच आर्थिक चणचण भासत राहते. या माध्यमातून बऱ्याचदा दैनंदिन गरजा पूर्ण करणे देखील कठीण होऊन बसते. त्यामुळे शेतीसोबत काहीतरी जोडधंदे करणे गरजेचे आहे.

त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातात अशा व्यवसायांमुळे पैसा खेळता राहील व त्यांना पैशांची टंचाई भासणार नाही. या दृष्टिकोनातून अनेक छोटे मोठे व्यवसाय असून कमीत कमी गुंतवणुकीत चांगला पैसा देणाऱ्या व्यवसायांची निवड करून असे व्यवसाय करणे शेतकऱ्यांसाठी फायद्याचे ठरू शकते. या अनुषंगाने आपण या लेखांमध्ये कमी गुंतवणुकीत चांगला आर्थिक परतावा देणाऱ्या तीन व्यवसायांची माहिती घेणार आहोत.

चांगला आर्थिक परतावा देणारे व्यवसाय

1- पिठाची गिरणी- हा व्यवसाय ग्रामीण भागामध्ये खूप चांगल्या पद्धतीने चालणारा व्यवसाय असून या माध्यमातून शेतकरी बंधू शेती करत असताना खूप चांगला पैसा कमवू शकतात. अगदी तुम्ही राहतात त्या घरी देखील तुम्ही गिरणी बसवून हा व्यवसाय सुरू करू शकतात. तसेच बरेच उदाहरण आहेत की ते फिरता गिरणीचा देखील व्यवसाय करतात. म्हणजेच जर तुमच्याकडे ट्रॅक्टर असेल तर ट्रॅक्टरच्या सहाय्याने तुम्ही पिठाची गिरणी एका ठिकाणी स्थापन करण्यापेक्षा ती वेगवेगळ्या परिसरामध्ये फिरवून देखील हा व्यवसाय उत्तम पद्धतीने करता येतो. या व्यवसायाच्या माध्यमातून शेतीला पैसा तर उपलब्ध होईलच परंतु एक्स्ट्रा इन्कम देखील शेतकऱ्यांना मिळून अनेक छोट्या मोठ्या गरजा शेतकरी व्यवस्थित पद्धतीने पूर्ण करू शकतील.

2- कोंबडी पालन अर्थात पोल्ट्री फार्म- जर सध्या विचार केला तर ग्रामीण आणि शहरी भागांमध्ये चिकन आणि कोंबडीचे अंडे यांचे मागणी दिवसेंदिवस वाढत असून कोंबडी पालन अर्थात पोल्ट्री फार्म व्यवसायाला खूप चांगले दिवस आलेले आहेत. अगदी छोट्या पद्धतीने देखील तुम्ही कोंबडी पालन व्यवसाय सुरू करू शकतात व या माध्यमातून चांगला नफा कमवू शकतात. तुमच्या स्थानिक बाजारात किंवा स्थानिक परिसरामध्ये देखील तुम्ही अंड्यांची आणि कोंबड्यांची विक्री करून चांगला पैसा मिळवू शकतात. महत्त्वाचे म्हणजे कोंबडी पालन व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्ही सरकारच्या अनेक योजनांचा देखील लाभ मिळू शकतात. अशा योजनांच्या माध्यमातून अनुदान आणि बँकांच्या माध्यमातून स्वस्त व्याजदरात कर्ज उपलब्ध होते. त्यामुळे शेती करत असताना हा व्यवसाय देखील खूप फायद्याचा ठरू शकतो.

3- डेअरी फार्म- सध्या वाढती लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर दूध आणि दुधापासून तयार होणारे पदार्थांची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. दुधापासून दुग्धजन्य पदार्थ तयार करणाऱ्या व्यवसायाला देखील आता ग्रामीण भागात देखील खूप मोठी मागणी असून या पदार्थांचे मागणीत दिवसेंदिवस वाढत होत आहे. त्यामुळे शेती करत असताना दहा ते बारा गाय किंवा म्हशी विकत घेऊन डेरी फार्मचा व्यवसाय सुरू केला तर तो खूप फायद्याचा ठरू शकतो. तसेच यामध्ये जर संकरित व्यतिरिक्त देशी गाईंचे पालन केले तर या गाईंचे दूध आणि त्यापासून जर तुपाचा व्यवसाय केला तर नक्कीच याला चांगली किंमत मिळते. दुसरे महत्त्वाचे म्हणजे या व्यवसायाच्या माध्यमातून शेतीला शेणखत उपलब्ध तर होतेच. परंतु हे शेणखत इतर शेतकऱ्यांना विकून देखील खूप चांगला पद्धतीने पैसा मिळतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe