Business Idea : ‘या’ व्यवसायासाठी सरकार देत आहे शेतकऱ्यांना तब्बल 50% पर्यंत अनुदान, जाणुन घ्या

Published on -

Business Idea : कृषिप्रधान (Agrarian) देश म्हणून भारत (India) देशाची ओळख असून या देशात शेती (Agriculture) हा मुख व्यवसाय केला जातो. ग्रामीण भागातील 80 टक्के लोक शेतीसोबत पशुपालनाचा (Animal Husbandry) जोडव्यवसाय करतात.

केंद्र सरकार आणि राज्य सरकार पशुपालनाला चालना देण्यासाठी त्याचबरोबर कमी जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या योजना राबवत असते. त्याचप्रमाणे पशुपालनाला अधिक चालना देण्यासाठी केंद्र सरकार (Central Government) काही योजना राबवत आहे.

योजनेचे उद्दिष्ट

राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत सरकार शेतकरी आणि पशुपालकांचे उत्पन्न (Income) वाढवण्यावर भर देत आहे. अन्न आणि चाऱ्याची मागणी आणि उपलब्धता यातील तफावत भरून काढणे, देशी जातींचे संवर्धन आणि सुधारणा करणे हा त्याचा मुख्य उद्देश (Purpose) आहे.

या सर्वांशिवाय भूमिहीन, अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांसाठी उपजीविकेच्या संधींमध्ये वाढ, जागरुकता वाढणे आणि पशुपालक शेतकऱ्यांची एकूणच सामाजिक-आर्थिक उन्नती होत आहे.

“चांगला नफा मिळवा”

“भारताच्या ग्रामीण भागात लोक मेंढ्या, शेळ्या आणि डुक्कर मोठ्या प्रमाणात पाळतात. शेतकर्‍यांसाठी हे फायदेशीर व्यवहार आहे. एक, या प्राण्यांच्या टाकाऊ पदार्थापासून ते शेतासाठी खत मिळवतात. याशिवाय मेंढ्या, बकरी आणि डुकराचे मांस बाजारात विकून चांगला नफा कमावतात.”

“येथे अर्ज करा”

या योजनेंतर्गत पशुपालकांना गावामध्ये कोंबड्यांसाठी पोल्ट्री फार्म, मेंढ्या, शेळ्या व डुकरांसाठी शेड बांधणे, चारा व चारा व्यवस्था यासाठी त्याच्या किमतीच्या 50 टक्क्यांपर्यंत अनुदान दिले जाते. या योजनेबद्दल अधिक माहितीसाठी किंवा अर्ज करण्यासाठी, तुम्ही https://dahd.nic.in/national_livestock_mission ला भेट देऊ शकता.”

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe