Business Idea: फक्त करा एक छोटा बदल आणि तुमची कार बनणार कमावती मशीन…. लगेच करा सुरुवात!

Karuna Gaikwad
Published:

Profitable Business Idea:-आजच्या काळात केवळ गाडी असणे ही प्रतिष्ठेची बाब राहिलेली नाही तर ती उत्पन्न मिळवण्याचे एक प्रभावी साधनही बनली आहे. जर तुमच्याकडे कार असेल आणि ती वारंवार वापरली जात नसेल तर तिला उभी ठेवण्यापेक्षा वेगवेगळ्या प्रकारे उत्पन्नाचे साधन त्या माध्यमातून तुम्ही निर्माण करू शकता. योग्य नियोजन करून आणि काही प्रमाणात गुंतवणूक करून तुम्ही तुमच्या कारच्या माध्यमातून दरमहा हजारो रुपये कमवू शकता.

कारचा वापर करून करता येणारे व्यवसाय

फूड व्हॅनमध्ये गाडीचे रूपांतर करून व्यवसाय सुरू करा

जर तुमच्याकडे जुनी कार असेल आणि तुम्हाला व्यवसाय सुरू करायचा असेल तर ती फूड व्हॅनमध्ये रूपांतरित करणे हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. हल्ली स्ट्रीट फूड व्यवसाय झपाट्याने वाढत आहे आणि कमी गुंतवणुकीत जास्त नफा मिळवण्याची संधी उपलब्ध आहे. तुम्ही गाडीतून फास्ट फूड जसे की सँडविच, बर्गर, वडा-पाव, मोमोज किंवा चहा-कॉफी विकू शकता. गाडीच्या आतील भागात आवश्यक त्या सुधारणा केल्यास आणि संबंधित परवाने घेतल्यास व्यवसाय सुरळीत चालू शकतो. कमी जागेत आणि कमी खर्चात सुरू करता येणारा हा व्यवसाय अनेक जण मोठ्या प्रमाणावर करत आहेत आणि दरमहा चांगला नफा मिळवत आहेत.

कंपनीच्या कार पूल सेवेत तुमची गाडी वापरून उत्पन्न मिळवा

आजकाल अनेक कंपन्या त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी पिकअप आणि ड्रॉप सुविधा पुरवतात. जर तुम्ही तुमची कार वारंवार वापरत नसाल तर एखाद्या कंपनीसोबत करार करून कार पूल सेवेत सहभागी होऊ शकता. अशा प्रकारच्या सेवेत सहभागी झाल्यास तुम्हाला दरमहा स्थिर उत्पन्न मिळू शकते. यामुळे तुमच्या कारच्या देखभालीचा खर्च सहज भरून निघतो आणि नियमितपणे उत्पन्नाचा स्रोतही तयार होतो.

ओला/उबरमध्ये कार लावून चांगले उत्पन्न मिळवा

पूर्वी ओला आणि उबेर या सेवा फक्त मोठ्या शहरांमध्ये मर्यादित होत्या.पण आता त्या लहान-मोठ्या शहरांमध्येही उपलब्ध झाल्या आहेत. जर तुमच्याकडे कार असेल आणि तुम्ही ती चालवू शकत असाल तर ओला किंवा उबेरमध्ये नोंदणी करून तुम्ही चांगले उत्पन्न मिळवू शकता. पूर्णवेळ किंवा अर्धवेळ गाडी चालवून महिन्याला २५,००० ते ५०,००० रुपये सहज कमावता येतात. जर तुम्हाला स्वतः गाडी चालवायची नसेल तर एखाद्या ड्रायव्हरला ठेवूनही ही सेवा सुरू ठेवता येते.

शाळा किंवा कॉल सेंटरसाठी गाडी वापरून कमाई करा

शाळांमध्ये विद्यार्थ्यांना वाहतूक सेवा देण्यासाठी मोठ्या प्रमाणात गाड्यांची आवश्यकता असते. जर तुम्ही दररोज तुमची कार वापरत नसाल तर ती शाळांकरीता वाहनसेवेसाठी वापरण्याचा विचार करू शकता. याशिवाय कॉल सेंटरसाठी नाईट शिफ्टमध्ये गाडी चालवण्याची मोठी मागणी असते. अशा कंपन्यांमध्ये तुमची कार वापरली गेल्यास दरमहा स्थिर उत्पन्न मिळवू शकता.

गाडी भाड्याने देऊन पैसे कमवा

गाडी भाड्याने देणे हा देखील उत्तम पर्याय आहे. अनेक जण प्रवासासाठी किंवा लग्नसमारंभांसाठी गाड्या भाड्याने घेतात. तुम्ही तुमची गाडी स्थानिक ट्रॅव्हल एजन्सीमध्ये नोंदणी करू शकतात.ज्यामुळे लोक तुमच्या गाडीचे बुकिंग करू शकतील. विशेषतः लग्नसराईच्या हंगामात याला खूप मोठी मागणी असते आणि तुम्ही या माध्यमातून चांगले उत्पन्न मिळवू शकता.

जाहिरातीसाठी गाडीचा उपयोग करून कमाई करा

तुमच्या गाडीचा उपयोग जाहिरातींसाठी करून तुम्ही चांगले उत्पन्न मिळवू शकता. अनेक मोठ्या कंपन्या जाहिरातींसाठी खाजगी गाड्या वापरतात आणि त्या बदल्यात गाडीच्या मालकाला पैसे दिले जातात. गाडीवर स्टिकर लावणे किंवा गाडीच्या मागच्या काचेवर मोठ्या ब्रँड्सची जाहिरात प्रदर्शित करणे यासाठी कंपन्या १०,००० ते १५,००० रुपये सहज देतात.

तुमच्याकडे कार असेल आणि ती वापरली जात नसेल तर तिचा उपयोग करून तुम्ही उत्पन्नाचे साधन तयार करू शकता. फूड व्हॅन, कॅब सेवा, कार पूल, शाळा-कॉलेज ट्रान्सपोर्ट, कार भाड्याने देणे किंवा जाहिरातींसाठी गाडीचा उपयोग करणे यासारखे अनेक मार्ग तुमच्या समोर आहेत. थोडेसे नियोजन करून आणि योग्य निर्णय घेऊन तुम्ही तुमच्या गाडीतून दरमहा हजारो रुपये कमवू शकता. गाडीला फक्त उभे न ठेवता तिचा उपयोग स्मार्ट पद्धतीने करा आणि घरबसल्या चांगले उत्पन्न तुम्ही मिळवू शकतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe