Business Idea : अनेकजण आता व्यवसायाकडे वळू लागले आहेत. जर तुम्हाला तुमचा व्यवसाय सुरु करायचा असेल आणि तुम्हाला कोणता व्यवसाय सुरु करावा हे समजत नसेल तर तुमच्यासाठी बातमी कामाची आहे. सरकार देखील आता व्यवसाय सुरु करण्यासाठी प्रोत्साहन देत आहे.
ज्यामुळे तुम्हाला त्याचा फायदा होईल. जर तुम्ही जर्दाळू तेल प्रक्रिया युनिटची स्थापना केली तर तुम्हाला त्याचा खूप फायदा होईल. कमाईचा विचार केला तर तुम्ही प्रत्येक महिन्याला 50 ते 60 हजार रुपये सहज कमावू शकता. हे लक्षात घ्या की तुमचा व्यवसाय वाढत जाईल तसतसा तुमचा नफा वाढत जाईल.

खादी आणि ग्रामोद्योग आयोग (KVIC) च्या अहवालानुसार, 2020 – 2025 दरम्यान जागतिक जर्दाळू तेलाची बाजारपेठ 4.8% च्या CAGR ने वाढण्याचा अंदाज असून आरोग्याबाबत जागरूक ग्राहकांमध्ये उच्च दर्जाच्या अत्यावश्यक तेलांचा वापर वाढण्याबरोबरच सेंद्रिय आरोग्यावर आधारित उत्पादनांच्या मागणीने बाजाराला पाठिंबा देण्यात आला आहे. त्यामुळे तुमच्यासाठी हा व्यवसाय फायदेशीर ठरेल.
किती येईल खर्च?
महत्त्वाचे म्हणजे KVIC ने जर्दाळू तेल प्रक्रिया युनिटचा अहवाल तयार केला असून अहवालानुसार, जर्दाळू तेल प्रक्रिया युनिट उभारण्यासाठी 10.79 लाख रुपये खर्च येतो. परंतु तुम्ही तो केवळ 1 लाख 80 हजार रुपयांपासून सुरू करू शकता. उरलेली रक्कम तुम्ही फायनान्स करू शकता.
अहवालानुसार, जर्दाळू तेल प्रक्रिया युनिट स्थापन करण्यासाठी तुमच्याकडे स्वतःची जमीन किंवा भाड्याने जागा असावी लागते. हा प्लांट आणि यंत्रसामग्रीसाठी 5 लाख रुपये, फर्निचर आणि फिक्सरसाठी 1 लाख 50 हजार रुपये आणि खेळत्या भांडवलासाठी 4 लाख 29 हजार रुपये गरजेचे असतात.
महिन्याला कमवा 50 ते 60 हजार रुपये
KVIC अहवालानुसार, जर्दाळू तेल प्रक्रिया युनिट व्यवसायातून तुम्हाला प्रत्येक महिन्याला ६० हजार रुपये कमवता येतील. पहिल्या वर्षी तुमचा नफा 2.08 लाख रुपये असू शकतो. तसेच तुमचा जसजसा व्यवसाय वाढत जाईल तसतसा तुमचा नफा वाढत जाईल.