Business Idea : घरबसल्या 10,000 रुपयांत सुरु करा हा व्यवसाय! होईल नोकरीपेक्षा दुप्पट कमाई; कसे ते जाणून घ्या

Published on -

Business Idea : अनेकांना नोकरी करण्यापेक्षा व्यवसाय करायला खूप आवडतो. जर तुम्ही नवीन व्यवसाय सुरु करत असाल तर तुम्हाला बाजाराची संपूर्ण माहिती असावी. नाहीतर तुम्हाला माहिती नसल्याने खूप मोठा आर्थिक फटका बसू शकतो.

काही असे व्यवसाय आहेत जे संपूर्ण वर्षभर चालतात. शिवाय त्यात कमी गुंतवणूक करावी लागते. इतकेच नाही तर तुम्हाला त्यात चांगली कमाई करता येईल. तुम्हाला घरी बसून हा शानदार व्यवसाय सुरु करता येईल. कसे ते जाणून घ्या सविस्तर.

करावी लागेल 10,000 रुपयांची गुंतवणूक

जर तुम्हाला हा व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्हाला केवळ 10,000 रुपयांची गरज भासणार आहे. ब्रेड बनवण्यासाठी लागणारे साहित्यात गव्हाचे पीठ किंवा सर्वांगीण पीठ, मीठ, पाणी, साखर, बेकिंग पावडर किंवा यीस्ट, ड्राय फ्रुट आणि दूध पावडर.

कोठेही सुरु करता येईल व्यवसाय

जर तुम्हाला हा व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या जागेची किंवा दुकानाची गरज पडणार नाही. याची सुरुवात तुम्ही घरी बसून अगदी सहज करू शकता. हे लक्षात घ्या की ब्रेड बनवायला जास्त वेळ लागत नाही. खूप कमी वेळात ब्रेड तयार होते. आता ते तुम्ही बनवून सहज बेकरी किंवा मार्केटमध्ये विकून चांगला नफा मिळवू शकता. हे लक्षात घ्या की तुम्हाला त्यात जास्त गुंतवणूक करण्याची गरज पडणार नाही. सध्या, ब्रेड खाणाऱ्यांची संख्या खूप वाढली असून जी भविष्यात आणखी वाढू शकते.

मार्केट

खरंतर ब्रेड ही सर्वसाधारणपणे ग्राहकोपयोगी वस्तू असून सामाजिक जागरूकता आणि राहणीमानात वाढ झाली असल्याने तयार खाद्यपदार्थांची मागणी देखील वाढू लागली आहे. ग्रामीण विकासांतर्गत विकसित होत असणाऱ्या ग्रामीण उद्योगांमध्ये सध्या बेकरी उद्योगही आघाडीवर आहे. महत्त्वाचे म्हणजे भविष्यात त्याची मागणी अनेक पटींनी वाढू शकते. भारत हे बेकरी उत्पादनांचे प्रमुख उत्पादन गृह असून युनायटेड स्टेट्स आणि चीन (NPCSA 2013) नंतर बिस्किट उत्पादन करणारा तिसरा सगळ्यात मोठा देश आहे.

भारतीय बेकरी क्षेत्रात ब्रेड, बिस्किटे, केक इत्यादी काही मोठ्या खाद्य श्रेणींचा समावेश होत असून मागील आर्थिक वर्षात 17,000 कोटी रुपये आणि पुढील 3.4 वर्षांत 13.15 टक्के असाधारण दराने वाढ होऊ शकते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे वाढते शहरीकरण आणि डिस्पोजेबल उत्पन्न हे बेकरी उत्पादनांची मागणी वाढवणारे प्रमुख घटक आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe