Business Idea : एकही रुपया न गुंतवता सुरू करा हा शानदार व्यवसाय, मिळेल सरकारी 2 लाखांची मदत

Ahmednagarlive24 office
Published:
Business Idea

Business Idea : सध्या नोकरीपेक्षा व्यवसायात जास्त पैसे मिळत आहेत. तुम्ही जर तुमचा व्यवसाय सुरु केला तर तुम्हालादेखील याचा लाभ मिळू शकतो. असाच एक व्यवसाय आहे जो तुम्ही एकही रुपया न गुंतवता सुरू करू शकता. इतकेच नाही तर तुम्हाला सरकारी 2 लाखांची मदत मिळेल.

सरकारकडून मार्च 2024 पर्यंत देशभरात प्रधानमंत्री जनऔषधी केंद्रांची संख्या 10,000 पर्यंत वाढवण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. सर्वसामान्य नागरिकांना स्वस्त दरात अत्यावश्यक औषधे मिळावी यासाठी ही जनऔषधी केंद्रे चालू केली आहेत.

3 श्रेणी

हे लक्षात घ्या की प्रधानमंत्री जनऔषधी केंद्र चालू करण्यासाठी 3 श्रेणी आहेत. एका श्रेणीतील कोणतीही व्यक्ती ज्याच्याकडे डी-फार्मा किंवा बी-फार्माची डिप्लोमा/पदवी असावी किंवा ती वैद्यकीय व्यवसायी असणे खूप गरजेचा आहे.

तुम्ही प्रधानमंत्री जनऔषधी केंद्रासाठी अर्ज करू शकता. तसेच दुसर्‍या श्रेणीत, कोणताही ट्रस्ट, एनजीओ आणि खाजगी रुग्णालय या स्टोअरसाठी अर्ज करू शकतात आणि तिसर्‍या श्रेणीत, राज्य सरकारांनी नामनिर्देशित केलेल्या एजन्सींना केंद्र उघडण्याची संधी मिळेल.

प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी योजना (PMJAY) अंतर्गत, सरकार SC, ST आणि अपंग अर्जदारांना औषध चालू करण्यासाठी 50,000 रुपयांपर्यंतची औषधे आगाऊ देत आहे.

मिळेल कमिशन

प्रधानमंत्री जनऔषधी केंद्रामध्ये औषधांच्या विक्रीवर 20 टक्के कमिशन उपलब्ध असून दर महिन्याला होणाऱ्या विक्रीवर 15 टक्क्यांपर्यंत वेगळे प्रोत्साहन मिळते. तर त्याच वेळी, या योजनेत, सरकार दुकान चालू करण्यासाठी फर्निचर आणि इतर वस्तूंसाठी 1.5 लाख रुपयांपर्यंतची मदत मिळते. याशिवाय 50,000 रुपयांची अतिरिक्त मदत मिळेल, जेणेकरून तुम्ही बिल बनवण्यासाठी संगणक आणि प्रिंटर देखील खरेदी करू शकता.

असा करा अर्ज

प्रधान मंत्री जनऔषधी केंद्र चालू करण्यासाठी, अर्जदाराला या http://janaushadhi.gov.in/ साठी नियुक्त केलेल्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागणार आहे. या ठिकाणी फॉर्म डाउनलोड करून यासाठी अर्ज करतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe