Business Idea : उत्पन्नासाठी अनेकजण नोकरी करतात. परंतु त्यांना नोकरीतून पाहिजे तशी कमाई करता येत नाही, त्यामुळे तुम्ही नोकरी सोबत लहान व्यवसाय सुरु करू शकता. सध्या असा एक व्यवसाय आहे ज्यातून तुम्हाला आयुष्यभर कमाई करता येईल.
तुम्ही देखील हा व्यवसाय सुरु करू शकता. सर्वात महत्त्वाचे म्हणजे कमी गुंतवणुकीत तुम्हाला प्रत्येक वर्षाला या व्यवसायातुन चांगली करता येईल. तुम्हाला हा व्यवसाय सुरु करण्यासाठी कोठेही ट्रेनिंग घेण्याची गरज नाही.

सुपारीचे भारतात उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. आकडेवारीनुसार सांगायचे झाले तर, जगातील 50 टक्के सुपारीचे उत्पादन भारतात घेण्यात येते. खरंतर सुपारीचा वापर पूजा आणि धार्मिक विधींमध्ये करण्यात येतो. त्यामुळे भारतात सुपारीची मागणीही खूप जास्त आहे.
अशी कर शेती सुरू
जर तुम्हाला सुपारीची शेती करायची असेल आणि तुमच्याकडे पैसे कमी असतील तर काळजी करू नका. कारण जास्त गुंतवणूक करण्याची गरज नाही. तुम्ही सुपारीची लागवड कोणत्याही जमिनीत करू शकता. हे लक्षात ठेवा की सुपारी लागवडीसाठी चिकणमाती सर्वोत्तम मानली जाते. त्याच्या लागवडीसाठी सर्वात अगोदर बियाण्यांपासून झाडे तयार करतात. म्हणजे रोपवाटिका तंत्राचा वापर करून तुम्हाला ही शेती करतात. सर्वात अगोदर बेडमध्ये बिया तयार केल्या जातात. ज्यावेळी या बिया रोपांच्या स्वरूपात तयार होतात त्यावेळी ते शेतात पेरले जातात.
लक्षात ठेवा या गोष्टी
लागवड करत असताना हे लक्षात ठेवा की ही झाडे ज्या ठिकाणी लावाल त्या ठिकाणी पाण्याचा प्रवाह चांगला असावा. सुपारीची लागवड पावसाळ्यात सुरू करतात त्यामुळेच हे लक्षात ठेवा की त्याच्या झाडांजवळ पाणी साचू नये. पाण्याच्या चांगल्या प्रवाहासाठी तुम्ही त्याच्या झाडांजवळ लहान नाले बनवू शकता. जर तुम्ही खतासाठी शेणखत किंवा कंपोस्ट खत वापरले तर चांगले होईल. त्याची झाडे नारळासारखी 50-60 फूट उंच असतात. ते 7-8 वर्षात फळ देण्यास सुरवात करतात.
उत्पन्न
जर सुपारीच्या बाजारभावावर नजर टाकली तर ती 400 ते 700 रुपये किलो दराने विकली जाते. महत्त्वाचे म्हणजे सुपारीच्या झाडाची फळे तीन चतुर्थांश पिकल्यावरच काढा. असे केल्याने तुम्ही लागवड केलेल्या सुपारीला बाजारात चांगला भाव मिळतो. तसेच तुम्ही जितकी जमीन लागवड कराल त्यानुसार तुमचा नफा देखील वाढू शकतो. अशा प्रकारे सुपारीची लागवड करून तुम्हाला घरी बसून चांगली कमाई करता येईल.