Business Idea : कमी खर्चात सुरु करा ‘हा’ सुपरहिट व्यवसाय, कसे ते जाणून घ्या

Published on -

Business Idea : सध्या असे अनेक व्यवसाय आहेत ज्यातून तुम्ही गुंतवणूक करून चांगली कमाई करू शकता. समजा जर तुमच्याकडे पैसे नसतील तर काळजी करू नका. तुम्ही आता सरकारी मदत घेऊन तुमचा छोटासा व्यवसाय सुरु करू शकता. ज्यातून तुम्हाला चांगला नफा होईल.

साबण दैनंदिन जीवनात सर्वाधिक वापरली जाते. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला सहज प्रधानमंत्री मुद्रा कर्ज मिळेल. या साबणाची मागणी लहानांपासून मोठ्या शहरांपर्यंत असून अशा परिस्थितीत तुम्ही हा व्यवसाय कुठेही चालू करू शकता. तुम्हीही साबणाचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असल्यास तुम्हाला काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील.

असा सुरु करा व्यवसाय

नवीन व्यावसायिकांना संधी देण्यासाठी सरकारने प्रधानमंत्री मुद्रा योजना सुरू केली असून योजनेअंतर्गत, बँक नवीन व्यवसाय चालू करणाऱ्या लोकांना व्यवसायात खर्च केलेल्या एकूण रकमेच्या 80 टक्के कर्ज मिळेल. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी, सर्वात अगोदर तुम्हाला त्याचा प्रकल्प अहवाल तयार करावा लागणार आहे.

आता तुम्ही एका महिन्यात 3000 किलो साबण बनवू शकता. त्यासाठी तुम्हाला सुमारे 4 लाख रुपये खर्च येऊ शकतो. त्यापैकी सुमारे 32 हजार रुपये तुम्हाला स्वतःला गुंतवावे लागणार आहे. तर उरलेले पैसे तुम्हाला बँकेच्या कर्जाच्या स्वरूपात मिळतील. हा व्यवसाय चालवण्यासाठी तुम्हाला वर्षाला एकूण 47 ते 50 लाख रुपयांचा खर्च येईल.

होईल 6 लाख रुपयांची कमाई

या व्यवसायात तुमची वार्षिक कमाई 56 ते 57 लाख रुपये असणार आहे. तुम्हाला एका वर्षात सुमारे 6 ते 7 लाख रुपये निव्वळ नफा कमवता येतील. तुम्ही प्रत्येक महिन्याला 50 ते 60 हजार रुपये कमवू शकता.

अशी करा विक्री

हे लक्षात ठेवा की साबणाचा व्यवसाय सुरू केल्यानंतर सर्वात अगोदर त्याची स्थानिक बाजारपेठेत विक्री करा. त्यासाठी तुम्हाला स्थानिक किरकोळ बाजार आणि किराणा दुकानात विक्री करू शकता. त्यानंतर, तुम्ही साबणाचे चांगले मार्केटिंग करून मोठ्या प्रमाणावर उत्पादन करता येईल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe