Business Idea : जर तुम्ही तुमचा नवीन व्यवसाय सुरु करण्याच्या तयारीत असाल तर बातमी तुमच्या कामाची आहे. कारण सरकार आता व्यवसाय सुरु करू इच्छिणाऱ्यांसाठी आर्थिक मदत करत आहे. त्यामुळे तुम्ही आता सरकारी मदत घेऊन तुमचा व्यवसाय सुरु करू शकता.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्हाला हा व्यवसाय सुरु करण्यासाठी कोणत्याही प्रशिक्षणाची मदत घ्यावी लागणार नाही. कोणत्याही प्रशिक्षणाशिवाय तुम्ही तुमचा व्यवसाय सुरु करून तुम्ही लाखो रुपयांची कमाई सहज करू शकता. काय आहे हा व्यवसाय? जाणून घ्या.
बँका देत आहेत कर्ज
सर्वात म्हणजे यापैकी काही व्यवसायांसाठी बँका कर्ज देत आहेत. सध्या मार्केटमध्ये अशा एजन्सी आहेत, जे तुम्हाला व्यवसाय देतात. तुम्हाला ही कर्जे सौर उद्योगापासून दूरसंचार उद्योग, कृषी उद्योग, रिअल इस्टेट उद्योगासाठी मिळवता येतात.
25 वर्षे कमवा प्लांटमधून पैसे
सध्याच्या काळात सौरऊर्जेचे आकर्षण जगभर वाढत चालले आहे. अशातच आता सरकारही त्याला खूप प्रोत्साहन देत आहे. जर तुम्हाला तुमच्या इमारतीच्या छतावर सोलर प्लांट बसवायचा असल्यास तुमचे वीज बिल तर वाचेल पण तुम्ही यातून सोलर बिझनेसही करू शकता. तुम्हाला तुमच्या परिसरातील डिस्कॉमशी संपर्क साधावा लागणार आहे, जो तुमच्या घरी मीटर बसवेल, जेणेकरून तुम्ही डिस्कॉमला किती विजेची विक्री झाले आहे हे समजेल.
हे लक्षात घ्या की आता प्रत्येक राज्याच्या सौर धोरणाच्या आधारे कमाईचे दर निश्चित करण्यात आले आहेत. म्हणजे उदाहरणार्थ, दिल्लीमध्ये, डिस्कॉम्स 5.30 रुपये प्रति युनिटच्या आधारावर पेमेंट केले जाते. तर सोलर प्लांटसाठी, तुम्हाला प्रति किलोवॅट फक्त 70 ते 80 हजार रुपये गुंतवावे लागणार आहेत. त्याद्वारे तुम्हाला 25 वर्षांपर्यंत परतावा मिळेल. उद्योग मानकांनुसार, एक प्लांट जास्तीत जास्त 25 वर्षे काम करेल.