Business Plan : दिवाळीपूर्वी सुरु करा ‘हे’ सर्वाधिक मागणी असणारे व्यवसाय, होईल लाखोंचा फायदा

Ahmednagarlive24 office
Published:
Business Plan

Business Plan : जर तुम्ही व्यवसाय सुरु करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी एक शानदार संधी आहे. जर तुम्ही दिवाळीपूर्वी काही व्यवसाय केले तर तुम्हाला चांगली कमाई करता येईल. शिवाय तुम्हाला त्यात जास्त गुंतवणूक करावी लागत नाही.

पूजेचे साहित्य

तुम्ही आता दिवाळीपूर्वी पूजेच्या साहित्याचा व्यवसाय सुरु करू शकता. कारण दिवाळीच्या या पवित्र सणामध्ये दिव्यांपासून मेणबत्त्यांपर्यंत सर्व गोष्टींचा वापर करतात याची तुम्हाला चांगलीच माहिती आहे. दिवाळी म्हणजे दिव्यांचा सण होय.

तसेच हे लक्षात घ्या की या सर्व सणांसाठी तुम्हाला जास्त पैसे खर्च करण्याची गरज पडत नाही. आनंदाची बाब म्हणजे तुम्हाला हा व्यवसाय केवळ 7 हजार ते 8 हजारात करता येतो. तसेच तुम्हाला त्यातून चांगली कमाईही करता येते.

घर सजावटीसाठी लागणाऱ्या वस्तू

दिवाळीच्या सणामध्ये संपूर्ण देशातील लोक आपली घरे आणि दुकाने सजवत असतात. प्रत्येकजण स्वतःच्या घरामध्ये दिवे लावत असतो आणि फुलांची सजावट देखील करतात. त्यासाठी मोठ्या प्रमाणात कृत्रिम फुलांचा वापर करतात. त्यामुळे तुमच्याकडे हे दोन महिने भरपूर पैसे कमावण्याची चांगली संधी आहे. इतकेच नाही तर सणासुदीनंतर या सर्व वस्तूंचा वापर होतो, असे आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे तुम्हाला चांगला फायदा होईल.

दिव्यांचा व्यवसाय

सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्हाला आणखी एक व्यवसाय जो करता येईल तो म्हणजे दिव्यांचा व्यवसाय. तुम्हाला तर माहितीच आहे दिवाळी हा दिव्यांचा सण आहे. यानिमित्ताने मोठ्या प्रमाणावर घरे, दुकाने सजली जातात. या व्यवसायाने मागील काही वर्षांत जबरदस्त परतावा दिला आहे.

हे दिवे मोठ्या प्रमाणात आणण्यात येतात. महत्त्वाचे म्हणजे ते मोठ्या फरकाने विकले देखील जातात. हे लक्षात घ्या की तुम्हाला त्यासाठी मोठ्या सेटअपची गरज पडत नाही. आनंदाची बाब म्हणजे हा व्यवसाय 15 ते 20 हजार रुपयांच्या आत तुम्ही करू शकता. यातून तुम्हाला चांगला नफा मिळेल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe