Infinix Zero Ultra 5G : Infinix या दिग्ग्ज टेक कंपनीने आपला नवीन Infinix Zero Ultra 5G हा फोन काही दिवसांपूर्वी लाँच केला होता. या स्मार्टफोनची मूळ किंमत 49,999 रुपये इतकी आहे. कंपनीच्या या फोनमध्ये 200MP कॅमेरा देण्यात आला आहे.
या फोनवर एक्सचेंज बोनस तसेच बँक ऑफर उपलब्ध आहेत. त्यामुळे तुम्ही हा फोन अवघ्या 12 हजारात खरेदी करू शकता. Infinix Zero Ultra 5G हा फोन तुम्ही फक्त 12 मिनिटांत चार्ज होतो. अशी अप्रतिम संधी कुठे मिळत आहे ते जाणून घेऊयात सविस्तरपणे.

50 हजारांचा फोन केवळ 12 हजारात विकत घ्या
तुम्ही आता 200 मेगापिक्सेल कॅमेरा असणारा Infinix Zero Ultra 5G फोन विकत घेऊ शकता. कंपनीचा हा फोन 49,999 च्या MRP सह Flipkart वर सूचीबद्ध आहे, जो सध्या 17,000 रुपयांच्या फ्लॅट डिस्काउंटसह फक्त 32,999 रुपयांना खरेदी करता येणार आहे. एवढेच नाही तर तुम्ही त्याची किंमत आणखी 21,000 रुपयांनी कमी करू शकता.
कंपनीच्या या स्मार्टफोनवर फ्लिपकार्ट एक दोन हजार नव्हे तर एकूण 20,000 रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस देत आहे. हे देखील लक्षात ठेवा की बँकेच्या ऑफरचा लाभ घेत असताना, तुम्ही त्याची किंमत1000 रुपयांनी कमी करू शकता. तुम्ही बँक आणि एक्सचेंज ऑफर या दोन्हींचा पुरेपूर लाभ घेता आला तर तो तुम्ही फक्त 11,999 रुपये (₹32,999 – ₹20,000 – ₹1000) मध्ये फोन सहज विकत घेऊ शकता. कंपनीचा हा फोन Genesis Noir आणि Coslight Silver अशा दोन रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे.