Phone Under 20k : कमी किंमतीत खरेदी करा ब्रँडेड स्मार्टफोन! किंमत 20 हजारांपेक्षा कमी

Published on -

Phone Under 20k : भारतीय बाजारात सतत नवनवीन स्मार्टफोन लाँच होत आहेत. मागणी जास्त असल्यामुळे या सर्व स्मार्टफोनची किंमत जास्त आहे. त्यामुळे अनेकांना इच्छा असूनही हे स्मार्टफोन खरेदी करता येत नाहीत. परंतु, तुम्ही आता तुमच्या स्वप्नातला स्मार्टफोन खरेदी करू शकता ते ही अगदी कमी पैशात.

होय, कारण आता ब्रँडेड स्मार्टफोनवर खूप मोठी सवलत मिळत आहे. या सवलतींमुळे तुम्ही हे स्मार्टफोन 20 हजारांपेक्षा कमी किमतीत खरेदी करू शकता. या सर्व स्मार्टफोनमध्ये जबरदस्त फीचर्स देण्यात आले आहेत. त्यामुळे खरेदी करण्यापूर्वी ही लिस्ट एकदा पहाच.

1. Samsung Galaxy A23 5G

सॅमसंगचा हा स्मार्टफोन नुकताच लाँच केला आहे. फोनसोबत कंपनीने चार रियर कॅमेरे उपलब्ध करून दिले आहेत. ५० मेगापिक्सल्सच्या फोनमध्ये प्राथमिक लेन्स उपलब्ध आहे तर तीन कॅमेरे अल्ट्रा वाइड, डेप्थ आणि मॅक्रो आहेत. तसेच सेल्फीसाठी फोनमध्ये 13-मेगापिक्सेल कॅमेरा आहे.

सॅमसंग ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन (OIS) देखील कॅमेरासह समर्थित आहे. यात 120Hz च्या रिफ्रेश रेटसह 6.6-इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले आहे. Snapdragon 695 प्रोसेसर दिला आहे. या फोनमध्ये 16 जीबी रॅम असून व्हर्च्युअल रॅम आहे. फोनमध्ये 5000mAh बॅटरी आणि 25W फास्ट चार्जिंगसाठी सपोर्ट आहे. फोनची सुरुवातीची किंमत 18,499 रुपये इतकी आहे.

2. Realme 10 Pro 5G

Realme 10 Pro 5G या फोनची किंमत 18,999 रु. असून या फोनसोबत 108-मेगापिक्सेलचा प्राथमिक कॅमेरा उपलब्ध आहे. या फोनमध्ये मेटल फ्रेम डिझाइनसह 6.7-इंचाचा फुलएचडी प्लस एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 120Hz रिफ्रेश रेटसह येतो.

तसेच क्वाड-कोर स्नॅपड्रॅगन 695 5G प्रोसेसर फोनमध्ये उपलब्ध आहे. यात 108-मेगापिक्सेल प्राइमरी कॅमेरासह 2-मेगापिक्सेलचा दुय्यम कॅमेरा आहे. तर या फोनचा फ्रंट कॅमेरा 16 मेगापिक्सलचा आहे. हा 5,000 mAh बॅटरीसह येतो आणि 33W SuperVOOC फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो.

3. OnePlus Nord CE 2 Lite 5G

जर तुम्हाला OnePlus फोन 20 हजारांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करायचा असल्यास तुमच्यासाठी OnePlus Nord CE 2 Lite 5G हा एक चांगला पर्याय आहे. हा कंपनीचा आतापर्यंतचा सर्वात कमी किमतीत मिळणारा फोन आहे. यात कंपनीने 6.59-इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले आणि स्नॅपड्रॅगन 695 प्रोसेसर आणि 128 जीबी स्टोरेजसह 8 GB पर्यंत LPDDR4X रॅम दिली आहे.

तसेच या फोनमध्ये तीन रियर कॅमेरे आहेत, ज्यात प्राथमिक लेन्स 64 मेगापिक्सेल, दुसरी लेन्स 2 मेगापिक्सेल डेप्थ आणि तिसरी लेन्स 2 मेगापिक्सलची आहे. या फोनमध्ये सेल्फीसाठी 16-मेगापिक्सल कॅमेरा दिला आहे. फोनमध्ये 5,000 mAh बॅटरी आणि 33 वॅट सुपरवूक फास्ट चार्जिंगचा सपोर्ट आहे. जर तुम्हाला हा फोन खरेदी करायचा असेल तर या फोनची सुरुवातीची किंमत 19,999 रुपये आहे.

4. Moto G72

Moto G72 फोन 15,999 रुपयांना खरेदी करता येत आहे. स्टोरेजचा विचार केला तर यात 6GB + 128GB स्टोरेज उपलब्ध आहे. या फोनची प्राथमिक लेन्स 108 मेगापिक्सेलची आहे. तर दुसरी लेन्स 8 मेगापिक्सल्स हायब्रिड अल्ट्रा वाईड अँगल असून तिसरी लेन्स 2 मेगापिक्सल्स मॅक्रो आहे.

कंपनीच्या या फोनमध्ये 16-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. तर यात120Hz च्या रीफ्रेश रेटसह 6.6-इंचाचा फुल एचडी प्लस poOLED डिस्प्ले असून MediaTek Helio G99 प्रोसेसर उपलब्ध आहे. या फोनमध्ये 5000mAh बॅटरी आणि 30W TurboPower फास्ट चार्जिंगसाठी सपोर्ट आहे. परंतु, हे लक्षात ठेवा की हा फोन 4G कनेक्टिव्हिटीसह येतो.

5. Redmi Note 11 Pro Plus 5G

रेडमी या दिग्ग्ज टेक कंपनीचा Redmi Note 11 Pro Plus हा फोन 19,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत खरेदी करता येईल. या फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप उपलब्ध आहे, जो 108 मेगापिक्सेल प्राइमरी लेन्स, 8 मेगापिक्सेल अल्ट्रा वाइड सेन्सर आणि 2 मेगापिक्सेल मॅक्रो सेन्सरसह येत आहे.

तर सेल्फीसाठी या फोनमध्ये 16-मेगापिक्सेल कॅमेरा देण्यात आला आहे. Redmi Note 11 Pro Plus 5G मध्ये 6.67-इंचाचा सुपर AMOLED डिस्प्ले असून जो 120Hz रिफ्रेश रेटसह येतो. तसेच या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 695 प्रोसेसर उपलब्ध आहे. फोनमध्ये 5,000 mAh बॅटरी आणि 67 वॅट्सच्या जलद चार्जिंगसाठी समर्थन आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News