OPPO Smartphone Offer : 64MP कॅमेरा असणारा Oppo चा हा फोन 1,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करा! पहा फीचर्स

Published on -

OPPO Smartphone Offer : जर तुम्ही स्वस्तात चांगले फीचर्स असणारा स्मार्टफोन खरेदी करण्याच्या विचारात असाल तर तुमच्यासाठी ही बातमी फायद्याची आहे. कारण Oppo चा शक्तिशाली स्मार्टफोन OPPO F21 Pro मूळ किमतीपेक्षा खूपच कमी किमतीत तुमचा असू शकतो.

8GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेज असणाऱ्या या फोनची मूळ किंमत 27,999 रुपये इतकी आहे.परंतु, यावर मिळत असलेल्या सवलतीमुळे तुम्ही तो स्वस्तात खरेदी करू शकता. फ्लिपकार्टवर अशी भन्नाट ऑफर मिळत आहे. तसेच यावर इतर ऑफरही उपलब्ध आहेत.

..तर 1,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत घरी आणा हा फोन

ओप्पोचा हा फोन खरेदी करत असताना तुम्ही कोटक बँक क्रेडिट कार्डने व्यवहार केले तर तुम्हाला 750 पर्यंत 10% सूट मिळू शकते. तसेच Flipkart Axis Bank सह व्यवहार करण्यासाठी 5% कॅशबॅक उपलब्ध आहे. यावर एक्सचेंज ऑफर उपलब्ध असून तुम्ही जुन्या फोनवर 19,000 रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर मिळवू शकता.

समजा जर तुम्ही संपूर्ण एक्सचेंज ऑफरचा लाभ घेतला तर तुमच्या फोनची किंमत 1,000 रुपयांपेक्षा कमी होईल. जुन्या फोनवर एक्सचेंज ऑफर तुमच्या फोनच्या स्थितीवर अवलंबून असणार आहे हे लक्षात ठेवा.

असे आहे स्पेसिफिकेशन

कंपनीच्या या फोनमध्ये 6.4-इंचाचा AMOLED स्क्रीन असून ती 1080×2400 पिक्सेल रिझोल्युशनसह येते. स्क्रीनला 90Hz चा रिफ्रेश रेट सपोर्ट आहे तसेच टच सॅम्पलिंग रेट 180Hz आहे. कंपनीचा हा फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 680 चिपसेटने सुसज्ज आहे.

जर स्टोरेजबद्दल सांगायचे झाले तर हा फोन 8GB रॅम आणि 128GB अंतर्गत स्टोरेजसह येतो. कंपनीचा हा फोन Android 12 वर आधारित असून तो colorOS 12.1 वर काम करतो. तुम्हाला या फोनमध्ये 5GB वर्च्युअल रॅम मिळेल, ज्यामुळे तुम्ही फोनचे स्टोरेज 13GB पर्यंत वाढवू शकता.

मिळणार 64MP चा जबरदस्त कॅमेरा

यात ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. तर या फोनचा प्राथमिक कॅमेरा 64MP चा आहे. तसेच या फोनमध्ये 2MP मायक्रो लेन्स आणि 2MP डेप्थ सेन्सर दिला आहे. आपल्या वापरकर्त्यांसाठी कंपनीने सेल्फीसाठी फोनमध्ये 32MP फ्रंट कॅमेरा दिला आहे. फोनमध्ये 4500mAh बॅटरी आहे जी 33W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येते. अंडर-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर असलेल्या या फोनमध्ये कनेक्टिव्हिटीसाठी टाइप-सी पोर्ट आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe