मंत्रिमंडळ विस्ताराला स्थगिती नाही, फडणवीसांनी सांगितला असा अर्थ

Ahmednagarlive24 office
Published:

Maharashtra News:महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. पुढील १ ऑगस्ट ही तारीख देताना सर्वोच्च न्यायालयाने राज्यात सत्तेची परिस्थिती जैसे थे ठेवावी, असा आदेश दिला आहे.

त्यामुळे आता शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार का? त्याला स्थगिती आहे का? अशा चर्चा सुरू झाल्या. त्यावर प्रतिक्रिया देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मंत्रिमंडळ विस्ताराला स्थगिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे होत होणार आणि इतर कामकाजही सुरूच राहाणार.

याचा अर्थ सांगताना फडणवीस म्हणाले, “परिस्थिती जैसे थे कशाबद्दल आहे हे समजून घेतले पाहिजे. यातील दोन्ही बाजूंकडून एकमेकांना नोटिसा देण्यात आल्या आहेत. यावर जैसे-थेचा निर्णय कोर्टाने दिला आहे.

महणजे अपात्र ठरविणे वगैरे संबंधिच्या कार्यवाहीला स्थगिती आहे. याचा कामकाजावर काही परिणाम होणार नाही. यासंदर्भात कुणीही दिशाभूल करण्याचा प्रयत्न करू नये. मंत्रिमडळाचा विस्तार लवकरच होईल. आजच्या सुनावणीवर आम्ही समाधानी आहोत. कारण आमची बाजू भक्कम आहे, असेही फडणवीस म्हणाले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe