New Mobile Rule : सध्या स्मार्टफोन वापरणारे काही जण Truecaller वापरत आहेत. Truecaller मुळे आपल्याला कोण फोन करत आहे, याची माहिती अगोदरच समजते. त्यावरून आपण फोन उचलायचा की नाही, ते ठरवतो. त्यामुळे अलीकडे Truecaller चा वापर जास्त होत आहे.
याच बाबत सरकारने एक मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे आता Truecaller शिवाय फोन करणाऱ्याचे नाव समजणार आहे. कसे ते जाणून घेऊयात सविस्तर. लवकरच TRAI एक महत्वाची सेवा सुरु करणार आहे.

सरकारनेही यासाठी ग्रीन सिग्नल दिला आहे. दूरसंचार क्षेत्राची नियामक असलेल्या ट्रायने या दिशेने काम करण्यासाठी पुढाकार घेतला असून याबाबत आराखडा तयार केला जात आहे.
जर शासनाच्या या निर्णयाची अंमलबजावणी झाली तर Truecaller सारखे थर्ड पार्टी अॅप्सचा वापर कमी होईल. कारण हे एक धोकादायक अॅप आहे.
ट्रायचे अध्यक्ष पीडी वाघेला यांनी याबाबत माहिती दिली आहे. ते म्हणाले की ” ही यंत्रणा सुरू करण्याबाबत चर्चा सुरू झाली आहे. आत्ता आम्हाला याबाबत फक्त काही संदर्भ मिळाले आहेत. लवकरच त्यावर काम सुरू करणार आहे. या निर्णयाच्या अंमलबजावणीनंतर जेव्हा जेव्हा एखादी व्यक्ती कॉल करेल तेव्हा त्याचे केवायसी आधारित नाव मोबाइल स्क्रीनवर दिसणार आहे. ”
सर्वात महत्त्वाचे म्हणजे ट्राय खूप अगोदरपासून या प्रणालीवर काम करण्याच्या विचारात होते. दूरसंचार विभागाच्या सूचनेनुसार हे काम लवकरच सुरू केले जाणार आहे.