LPG Gas Checking : ओल्या कापडावरून समजेल तुमचा गॅस सिलिंडर संपला आहे की नाही?

Published on -

LPG Gas Checking : अनेकदा काही जणांच्या अचानक सिलिंडरमधील गॅस संपतो, त्यामुळे त्यांना नाहक त्रास सहन करावा लागतो. काहीजण गॅस सिलिंडरचा रंग आणि सिलिंडर हलवून गॅस संपला आहे की नाही ते ठरवतात.

त्याशिवाय तुम्ही एका ओल्या कपड्याच्या साहाय्यानेही तुमचा सिलिंडर शिल्लक आहे हे घरच्या घरी तपासू शकता.ओल्या कापडाच्या साहाय्याने सिलिंडर कसा तपासतात ते जाणून घेऊयात.

कारण स्वयंपाक करत असताना मध्येच गॅस अचानक संपल्याने अडचणी वाढत जातात. शक्यतो रात्री ही समस्या वाढते. जर तुमच्याकडे दुसरा सिलेंडर असेल तर ही समस्या जाणवत नाही. ही समस्या एकच कनेक्शन असलेल्या सर्व घरांमध्ये असते.

सिलिंडर संपण्यापूर्वी सावध व्हा

तुम्ही सिलिंडर संपण्यापूर्वी एक सिग्नल्सवर तुम्ही सतर्क राहू शकता. अनेकजण सिलेंडर उचलून त्याच्या वजनाच्या अंदाजानुसार सिलिंडर संपला आहे की नाही ते ठरवतात. परंतु,अनेक वेळा हा अंदाज बरोबर निघतोच असे नाही. यासाठी एक सोपी आणि अचूक पद्धत आहे.

सगळ्यात अगोदर तुमचा सिलेंडर एका ओल्या कपडाने झाकून ठेवा. त्यानंतर ते कापड काढा आणि बारकाईने पहा, सिलिंडर रिकामे असलेल्या भागात पाणी वेगाने सुकेल. लगेच त्यावर एका खडूने खूण करा.

कारण ज्या भागात गॅस असेल त्या भागातील पाणी काही वेळाने सुकते.सिलेंडरचा जो भाग रिकामा असतो तो गरम राहतो आणि जो भाग गॅसने भरलेला असतो तो पूर्वीपेक्षा थंड राहतो, हे लक्षात घ्या.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News