अहमदनगर Live24 टीम, 4 ऑगस्ट 2021 :- काही दिवसांपूर्वी राज्यातील अनेक जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पूरपरिस्थिती निर्माण होवून अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत.
त्यामुळे या कुटुंबाप्रती सामाजिक बांधिलकी जोपासून वाढदिवसाचे कोणतेही कार्यक्रम होणार नाहीत, अशी माहिती आमदार आशुतोष काळे यांच्या जनसंपर्क कार्यालयाकडून देण्यात आली.
आमदार काळे यांच्या वाढदिवसानिमित दरवर्षी ४ ऑगस्ट रोजी विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात व हजारो कार्यकर्ते पुष्पगुच्छ घेवून आमदार काळे यांना शुभेच्छा देण्यासाठी येत असतात.
मात्र राज्यातील काही जिल्ह्यात आलेल्या पुरामुळे अनेक कुटुंबांना त्याचा फटका बसून त्या कुटुंबांची मोठी हानी झाली आहे.निर्माण झालेली ही परिस्थिती पूर्वपदावर येण्यासाठी शासनाबरोबरच सामाजिक बांधिलकी देखील महत्वाची आहे.
माझा वाढदिवस जरी उद्या असला तरी आजपासूनच मला मतदार संघातील अनेक नागरिक फोनद्वारे वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत.
मात्र कोरोनाचे संकट अजून मिटलेले नाही. मान्य आहे आपण सर्व प्रकारच्या उपाययोजना केल्यामुळे परिस्थिती नियंत्रणात असली तरी पूरपरिस्थितीमुळे आपल्या बांधवांवर आलेल्या संकट काळात वाढदिवस साजरा करणे उचित नाही.
तसेच माझ्या वाढदिवसानिमित्त मी बाहेरगावी असल्यामुळे आपल्या शुभेच्छा स्वीकारू शकणार नाही. माझ्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा फ्लेक्स न लावता व पुष्प गुच्छावर होणारा खर्च टाळून,
या खर्चाची रक्कम पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देवून सामजिक दायित्व पार पाडावे, असे आवाहन आमदार काळे यांनी केले आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम