तिसरे अपत्य असल्याने कारणाने ‘त्या’ महिलेचे सदस्यत्व रद्द

Ahmednagarlive24 office
Updated:

अहमदनगर Live24 टीम, 15 डिसेंबर 2021 :- श्रीगोंदे तालुक्यातील निमगाव खलू ग्रामपंचायतच्या सदस्य वैशाली छबुराव कातोरे यांचे सदस्यपद तिसरे अपत्याच्या कारणाने जिल्हाधिकारी यांनी रद्द केले असून तसा आदेश काढला.(Shrigonda News)

निमगाव खलू ग्रामपंचायतीच्या सदस्य वैशाली छबुराव कातोरे या जानेवारी २०२१ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत बिनविरोध निवडून आलेल्या होत्या त्यांना २००१ नंतर तिसरे अपत्य होते.

परंतु निवडणूक अधिकाऱ्यापासून त्यांनी ते लपवून ठेवले होते. शंकर रामदास शिंदे यांनी कातोरे यांना तीन अपत्य असल्याने पुराव्यासह जिल्हाधिकारीसाहेबांकडे अपिल दाखल केले. त्यावर जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या आदेशात वैशाली छबुराव कातोरे या सदस्य पदावर राहण्यास अपात्र असल्याचे म्हटले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe