Maruti Suzuki Upcoming Car : मारुती सुझुकीने भारतीय बाजारपेठेत आपले स्थान निर्माण केले आहे. त्याशिवाय ग्राहकांच्या मनातही जागा निर्माण केलीय. त्यामुळे या कंपनीच्या सर्व कार्सना मार्केटमध्ये चांगली मागणी आहे.
कंपनी लवकरच त्यांच्या चाहत्यांना एक आनंदाची बातमी देण्याच्या तयारीत आहे. मार्केटमध्ये लवकरच Jimny SUV चे 5-डोअर कार लाँच होणार आहे. कांपनीने या कारमध्ये जबरदस्त फीचर्स दिली आहेत.

सादर केली जाणार एकूण 16 वाहने
ऑटो एक्सपो 2023 या इव्हेंटमध्ये सादर केल्या जाणार्या आगामी SUV पैकी एक Jimny SUV चे 5-डोअर ही एक कार असणार आहे. विशेष म्हणजे, कंपनीने ऑटो एक्सपो 2020 मध्ये SUV चे 3-डोअर ही कार सादर केली होती.तसेच या कारशिवाय ग्रँड विटारा, XL6 आणि सियाझ सारख्या मॉडेल्सचा समावेश असणार आहे.
WagonR फ्लेक्स-फ्यूल प्रोटोटाइप
कंपनीने अशी देखील पुष्टी केली आहे की ते या इव्हेंटमध्ये वॅगनआर फ्लेक्स-फ्यूल प्रोटोटाइप प्रदर्शित करणार आहे. या मॉडेलचे काही दिवसांपूर्वी अनावरण केले होते. ही नवीन ईव्ही संकल्पना आणि एसयूव्हीच्या श्रेणीचे अनावरण करून सेगमेंटचे नेतृत्व करण्याचे उद्दिष्ट असल्याचे कंपनीने सांगितले आहे.
असणार उत्तम संधी
मारुती सुझुकी इंडिया लि.चे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ हिसाशी ताकेउची म्हणाले की, ऑटोमेकरने चार दशकांहून अधिक काळ उद्योग-परिभाषित उत्पादने आणि तंत्रज्ञानाद्वारे ग्राहकांना गतिशीलता आनंद देण्यासाठी सतत प्रयत्न केले आहेत आणि अजूनही प्रयत्न करत आहे. येणारा कार्यक्रम हा त्यांच्यासाठी एक उत्तम संधी असणार आहे.