Car Insurance : पावसाच्या पाण्यात गाडी बुडली तर इन्श्युरन्स मिळतो का? काय सांगतो नियम जाणून घ्या

Published on -

Car Insurance : पूर, वादळ यांसारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे (Natural disaster) मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्त हानी होते. यामध्ये वाहनांचेही (Vehicles) मोठ्या प्रमाणात नुकसान होते.

कित्येक वाहनांचं इंजिन पाणी तुंबल्याने खराब होते. त्यासाठी वाहन चालकांना खूप पैसे खर्च करावे लागतात. परंतु, अनेकांना अशा परिस्थितीत विम्याची (Insurance) कल्पना नसते.

या गोष्टी लक्षात ठेवा :-

क्रमांक 1

जेव्हा तुम्ही कार विमा घेता तेव्हा लक्षात ठेवा की तुमच्या विम्यात ही तरतूद (Insurance provision) असली पाहिजे ज्यामध्ये कंपनी नैसर्गिक आपत्तीसारख्या परिस्थितीत दावा देते.

क्रमांक 2

जर असे होत नसेल तर विमा घेण्यापूर्वी ही गोष्ट अगोदर जाणून घ्या. याशिवाय विम्याच्या अटी व शर्ती (Terms and conditions of insurance) आणि तरतुदी नक्की वाचा.

तुम्ही या 4 गोष्टी करू शकता:-

  • वाहन पाण्याने भरले असल्यास किंवा ते पाण्यात बुडल्यानंतर वेळेवर विम्याचा दावा करा.
  • जर गाडीच्या इंजिनमध्ये पाणी शिरले असेल तर ते सुरू करणे टाळा.
  • बुडलेल्या कारची व्हिडिओग्राफी करा आणि फोटो क्लिक करा.
  • कारची सर्व कागदपत्रे ठेवा, जी दाव्याच्या वेळी आवश्यक असतील.

दावा काय आहे?

जर तुमची कार पावसाच्या पाण्यात बुडली किंवा ती पाण्याने भरली आणि खराब झाली तर इ. त्यामुळे अशा परिस्थितीत, सहसा कंपनीच्या वतीने विमा दावा भरण्याची तरतूद असते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News