Cash deposit limit : आज प्रत्येकाकडे बँक खाते असते. देशात खाजगी तसेच सरकारी बँका आहेत. तुम्ही कोणत्याही जास्त व्याजदर देणाऱ्या योजनेमध्ये गुंतवणूक करू शकता. काही जणांचे एकापेक्षा जास्त बँकेत खाते असते.
जर तुम्ही बँकेत पैशांची बचत असाल तर त्यापूर्वी तुम्हाला त्या बँकेचे संपूर्ण नियम माहिती असणे खूप गरजेचे आहे. कारण जर तुम्हाला काही नियम माहिती नसतील तर तुम्हाला खूप मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता असते.

बचत खात्यात किती रक्कम ठेवता येते?
अनेकजण आपली बचत ही बचत खात्यात ठेवत असतात. परंतु या खात्यात किती पैसे जमा करता येतील असा प्रश्न अनेकांच्या मनात तयार होतो. हे लक्षात घ्या या खात्यात रोख ठेवण्यावर कोणतीही मर्यादा नसते. याचा असा अर्थ आहे की तुम्हाला हवे तेवढे पैसे ठेवता येतात.
परंतु तुम्हला एका गोष्टीची विशेष काळजी घ्यावी लागते. तुम्ही या खात्यात तेवढीच रक्कम ठेवू शकता जी ITR च्या कक्षेत असते. समजा जर तुम्ही जास्त रक्कम ठेवली तर तुम्हाला मिळणाऱ्या व्याजावर कर भरावा लागू शकतो.
आयकर विभागाला द्या माहीती
हे लक्षात घ्या की तुमच्या बचत खात्यात तुम्हाला किती व्याज मिळते याची माहिती तुम्हाला आयकर विभागाला द्यावी लागणार आहे. इतकेच नाही तर तुम्ही खात्यात किती पैसे ठेवता तुमच्या बचत खात्यातील ठेवींमधून तुम्हाला मिळणारे व्याज तुमच्या उत्पन्नात जोडण्यात येते.
समजा, एखाद्या व्यक्तीचे वार्षिक उत्पन्न 10 लाख रुपये असल्यास तर त्याला 10,000 रुपये व्याज मिळत असेल, तर त्या व्यक्तीचे एकूण उत्पन्न 10,10,000 रुपये असते. समजा एखाद्या व्यक्तीने एका आर्थिक वर्षात 10 लाख रुपयांपेक्षा जास्त रोख ठेवल्यास तुम्हाला त्याची माहिती आयकर विभागाला द्यावी लागणार आहे. जर तुम्ही असे न केले नाही तर आयकर विभाग तुमच्यावर कारवाई करेल.