सावधान, पुढील तीन तास महत्वाचे

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 08 एप्रिल 2022 maharashtra weather :  दिवसभर तळपत्या उन्हाचा अनुभव घेतल्यानंतर आता सायंकाळी राज्याच्या अनेक जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

पुढील तीन तासांत काही भागात हा पाऊस अपेक्षित असून नागरिकांनी काळजी घ्यावी असे हवामान विभागाने कळविले आहे.

आज शुक्रवारी ८ एप्रिलला सायंकाळी पाच वाजता पुढील तीन तासांसाठीचा हा अंदाज वर्तविण्यात आला आहे. सातारा, कोल्हापूर, सांगली, पुणे, अहमदनगर, सोलापूर, लातूर, बीड, परभणी, नांदेड, नागपूर भंडारा, गोंदिया, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड या जिल्ह्यांसाठी इशारा देण्यात आला आहे.

या जिल्ह्यांच्या काही भागांत विजा, वादळी वाऱ्यांसह काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. उपग्रहाकडून मिळालेल्या माहितीनुसार या भागावर पावसाचे ढग दिसून आल्याचे म्हटले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe