Central Government Advertising Spending: आज गुरुवार एका प्रश्नाचा उत्तर देताना केंद्र सरकारने राज्यसभेमध्ये मोठी माहिती दिली आहे. या माहितीनंतर आता देशात अनेक चर्चांना उधाण आले आहे.
आम्ही तुम्हाला सांगतो केंद्र सरकारने गुरुवारी राज्यसभेत मागच्या पाच वर्षात जाहिरातींवर किती खर्च केला आहे याची माहिती दिली आहे. माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले की, गेल्या पाच वर्षांत केंद्र सरकारने केंद्रीय दळणवळण विभागामार्फत आपली धोरणे आणि कार्यक्रमांच्या जाहिरातींवर एकूण 3,723.38 कोटी रुपये खर्च केले आहेत. मात्र, ते पुढे म्हणाले की, गेल्या पाच वर्षांत सरकारने जाहिराती आणि प्रसिद्धीवरील खर्चात वाढ केलेली नाही. चला तर जाणून घ्या कोणत्या वर्षी केंद्र सरकारने जाहिरातींवर किती खर्च केला आहे.

सरकारने कोणत्या वर्षी किती कोटी रुपये खर्च केले
अनुराग ठाकूर यांनी संसदेत शेअर केलेल्या आकडेवारीनुसार, सरकारने 2017-18 मध्ये जाहिरातींवर 1,220.89 कोटी रुपये खर्च केले, तर 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या अगदी आधीच्या वर्षी म्हणजे 2018-19 मध्ये सरकारने 1,106.88 कोटी रुपये खर्च केले.
यानंतर सरकारने 2019-20 मध्ये 627.67 कोटी रुपये, 2020-21 मध्ये 349.09 कोटी रुपये आणि 2021-22 मध्ये 264.78 कोटी रुपये खर्च केले होते. चालू आर्थिक वर्षात 9 डिसेंबर 2022 पर्यंत सरकारने जाहिरातींवर 154.07 कोटी रुपये खर्च केले आहेत.
पाच वर्षांत जाहिरातींवरचा खर्च वाढला नाही
काँग्रेसचे सदस्य नसीर हुसेन यांनी सरकारला विचारले होते की, गेल्या काही वर्षांत जाहिरातींवर सरकारचा खर्च अनेक पटींनी वाढला आहे, याची जाणीव आहे का? याला उत्तर देताना अनुराग ठाकूर यांनी सभागृहात सांगितले की, या आकडेवारीवर नजर टाकली तर गेल्या काही वर्षांत जाहिरात आणि प्रसिद्धीवर सरकारचा खर्च वाढलेला नाही.
हे पण वाचा :- IMD Alert : सावधान ! 8 राज्यांमध्ये 18 डिसेंबरपर्यंत धो धो पाऊस ; जाणून घ्या लेटेस्ट अपडेट्स