EPFO : केंद्र सरकार अनेक योजना राबवत असते. यापैकीच एक EPS 95 ही योजना आहे. या योजनेलाच कर्मचारी पेन्शन योजना, EPS 95 किंवा ईपीएफ पेन्शन नावानेही ओळखले जाते.
दरम्यान केंद्र सरकारने या योजनेबाबत एक महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेतला आहे. EPFO चे देशभरात कोट्यवधी सदस्य आहेत. सरकारच्या या निर्णयामुळे खातेधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
कामगार मंत्रालय EPFO खातेधारकांसाठी EPS-95 नावाची योजना चालवत असून या खातेधारकांना किमान मासिक पेन्शन मिळते. एका ट्विटद्वारे ईपीएफओने आपल्या खातेदारांना माहिती दिली आहे.
Benefits payable to Widow/Widower & Children under EPS'95.#EPFO #EPF #Services #SocialSecurity #Employee #AmritMahotsav pic.twitter.com/63NZRAetuP
— EPFO (@socialepfo) December 20, 2022
यामध्ये खातेधारक त्याचबरोबर विधवा पुरुष किंवा महिला आणि मुलांचा समावेश असतो. या योजनेंतर्गत, जर एखाद्या खातेदाराचा त्याच्या नोकरीदरम्यान मृत्यू झाला, तर त्याच्या जोडीदाराला महिन्याला किमान 1000 रुपये इतकी पेन्शन देण्यात येते.
इतकेच नाही तर त्या खातेदाराच्या मृत्यूनंतर दोन मुलांना त्याच्या जोडीदाराला मिळणाऱ्या पेन्शनच्या 25 टक्के रक्कम दिली जाते. तसेच या दोन्ही मुलांना 25 वर्षे वयापर्यंत 25-25 टक्के समान रक्कम देण्यात येते.
हे लाक्षात घ्या की या योजनेचे पूर्ण नाव कर्मचारी पेन्शन योजना-1995 असे आहे. EPFO च्या या योजनेला EPS-95 असे नाव दिले. कारण ती 1995 मध्ये सुरू केली होती.