Uddhav Thackeray : केंद्रीय यंत्रणा पाळीव प्राण्यांसारख्या वागताहेत; उद्धव ठाकरेंचा निशाणा

Published on -

Uddhav Thackeray : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना काल जामीन मिळाल्यानंतर आज त्यांनी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्री वर जाऊन भेट घेतली. संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेतली यावेळी उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय यंत्रणा आणि केंद्र सरकारवर हल्लाबोल केला.

संजय राऊत यांना जामीन मिळाल्यानंतर मुंबईत ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष व्यक्त केला. तसेच ठिकठिकाणी बॅनर लावून संजय राऊत यांचे स्वागत करण्यात आले.

माध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, आनंदाखेरीज दुसरी प्रतिक्रिया असू शकत नाही. संजयच्या धाडसाचं कौतुक आहे. मुद्दाम आरेतुरे बोलतो.

संजय शिवसेनेचा नेता, खासदार, सामनाचा कार्यकारी संपादक आहे. त्याचबरोबरीनं जिवलग मित्र आहे. संकटाच्या काळात न डगमगता लढत असतो. संकटात तो लढतोय. काल कोर्टाने निकाल दिला. न्यायदेवतेचे मी आभार मानतो.

उद्धव ठाकरे यांनी बोलताना केंद्रीय यंत्रणांवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, काल स्पष्ट झालं. न्यायदेवतेचे आभार,. काही स्पष्ट निरीक्षणं नोंदवली आहे. केंद्रीय यंत्रणा पाळीव प्राण्यांप्रमाणे वागत आहे.

ज्याच्या अंगावर जा म्हटलं तर जात आहे. हे संपूर्ण जग बघत आहे. देश बघत आहे. गेल्या काही दिवसातील उदाहरणे आहेत असेही उद्धव ठाकरे पत्रकारांशी बोलताना म्हणाले आहेत.

न्यायालयाने काल दिलेल्या निकालावरही उद्धव ठाकरे यांनी भाष्य केले आहे. ते म्हणाले, न्याय देवताही आपपल्या अंकित करण्याची सुरुवात केंद्र करतात की काय अशी केंद्रीय कायदामंत्री रिजिजू यांची विधाने आहेत.

सर्व सामान्यांच्या आशेचा किरण न्यायालय असतात. न्यायालय आपल्या बुडाखाली घेण्याचा कोणी प्रयत्न करत असेल तर त्याला विरोध केला पाहिजे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe