CET Exams : अहमदनगर जिल्ह्यातील ९ केंद्रांवर होणार सीईटी परीक्षा !

Ahmednagarlive24 office
Published:

CET Exams :राज्य सामायिक प्रवेश परीक्षेसाठी (सीईटी) नगर जिल्ह्यात आठ केंद्र बुधवारी निश्चित करण्यात आले अाहेत. या आठ केंद्रावर ५ ते ११ ऑगस्ट दरम्यान पीसीएम तर १२ ते २० ऑगस्ट दरम्यान पीसीबी ग्रुपसाठी परीक्षा होणार आहेत.

१४ हजार २६१ पीसीएम तर पीसीबीसाठी १९ हजार १२२ उमेदवार परीक्षा देणार आहेत, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांनी दिली.

मुंबई राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष आयुक्त यांच्याकडून घेण्यात येणाऱ्या शैक्षणिक वर्ष २०२२-२३ साठी अहमदनगर जिल्हा केंद्रावर ५ ते ११ ऑगस्ट (९ऑगस्ट वगळून) या कालावधीमध्ये पीसीएम ग्रुप व १२ ते २० ऑगस्ट (१४, १५, १९ ऑगस्ट वगळून) या कालावधीमध्ये पीसीबी ग्रुपसाठी परीक्षा घेण्यात येणार आहे.

या परिक्षा सकाळी ७.३०ते दुपारी १२ वाजेपर्यंत (प्रथम सत्र) व दुपारी १२.३० ते सायंकाळी ६.४५ पर्यंत (द्वितीय सत्र) या वेळेत ९ केंद्रांवर घेण्यात येणार आहेत. परीक्षेसाठी वर्ग २ च्या एकूण १६ अधिका-यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

या परीक्षेचे केंद्रप्रमुख म्हणून निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित हे काम पाहणार आहेत. परीक्षेस बसलेल्या उमेदवारांना सकाळ सत्रासाठी सकाळी ७.३० ते ८.३० वाजेपर्यंत प्रवेश मिळेल तर, दुपार सत्राकरीता दुपारी १२.३० ते १.३० वाजेपर्यंत प्रवेश देण्यात येणार आहे.

दोन ग्रूपसाठी उमेदवार या परीक्षेसाठी अहमदनगर जिल्हा केंद्रावर पीसीएम ग्रुपकरीता १४ हजार २६१ व पीसीबी ग्रुपकरीता १९ हजार १२२ उमेदवार परीक्षेस बसलेले आहेत. नगर जिल्हयातील पीसीएम ग्रुप करीता ८ व पीसीबी ग्रुप करीता ८ परीक्षा केंद्रावर उमेदवारांची बैठक व्यवस्था करण्यात आली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe