अहमदनगर Live24 टीम, 1 ऑगस्ट 2021 :- मैत्रीचे नाते खूप सुंदर असते जर एखादा मित्र खरा असेल तर तो प्रत्येक परिस्थितीत तुमचे समर्थन करतो, तुम्हाला योग्य मार्ग दाखवितो. परंतु जर एखाद्या चुकीच्या व्यक्तीशी मैत्री झाली तर ते संपूर्ण आयुष्य नष्ट करते.
आचार्य चाणक्य यांनीही चाणक्य नीतिमध्ये मैत्रीसंदर्भातील धोरणात काही गोष्टी सांगितल्या आहेत कुणावरही प्रमाणापेक्षा जास्त विश्वास ठेवणे योग्य नाही किंवा आपली एखादी सीक्रेट गोष्ट कुणाला सांगू नये. आचार्य चाणक्य यांनी आपल्या नीती शास्त्रात सांगितले आहे की, दुष्ट मित्रांपासून दूर राहिले पाहिजे, परंतु चांगल्या मित्रांना सुद्धा आपण लपवून ठेवलेली गोष्ट कधीही सांगू नये.
आचार्य चाणक्य यांनी आपल्या नीती शास्त्रात दुसर्या अध्ययाच्या 5 व्या श्लोका म्हटले आहे की – परोक्षे कार्यहन्तारं प्रत्यक्ष प्रियवादिनम वर्जयेत्तादृशं मित्रं विषकुंभम पयोमुखम या श्लोकात आचार्य चाणक्य सांगतात की, जो मित्र आपल्या तोंडावर गोड-गोड बोलतो, तो आपल्या पाठीमागे आपल्याबद्दल वाईट बोलतो. असे लोक आपले काम बिघडवण्याचा प्रयत्न करतात. अशा लोकांशी दोस्ती करू नये.
त्यांच्यापासून दूर होण्यातच भले असते. आचार्य चाणक्य म्हणतात की, अशा मित्रांच्या तोंडावर दूध दिसते, परंतु त्यांच्या आत विष भरलेले असते. अशा लोकांशी मैत्री आपल्यासाठी हानिकारक असते, यासाठी अशा लोकांशी मैत्री करू नका. पुढे आचार्य चाणक्य आपल्या नीती शास्त्रात दुसर्या अध्यायाच्या 6व्या श्लोकात म्हणतात की, वाईट लोकांवर विश्वास ठेवू नये.
न विश्वसेत कुमित्रे च मित्रे चा पि न विश्वसेत कदाचित कुपितं मित्रं सर्वं गुह्यं प्रकाशयेत या श्लोकात चाणक्य सांगतात की, आपण वाईट मित्रावर विश्वास ठेऊ नये. लक्षात ठेवा, जे लोक आपले मित्र आहेत, त्यांच्यावर सुद्धा जास्त विश्वास ठेवू नये. भविष्यात या मित्रांशी कधी भांडण झाले तर आपल्या गुप्त गोष्टी ते सर्वांसमोर आणू शकतात. यामुळे आपल्या समस्या वाढू शकतात आणि यामुळे नुकसान सुद्धा आपलेच होईल.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम