अहमदनगर Live24 टीम, 4 सप्टेंबर 2021 :- राज्यात पुढील 5 दिवसांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे दाट पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. राज्यात मागील काही दिवसांपासून पावासाने दडी मारली होती.
मात्र बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे मागील काही दिवसांपासून पावसाचे पुनरागमन झाले आहे. कोकणात 6 आणि 7 सप्टेंबर रोजी काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याची दाट शक्यता आहे.
तसेच राज्यातील इतर भागात विजांच्या कडकडाटासह पाऊस बरसण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. तर आज राज्यातील एकूण 15 जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
हिंगोली, बीड, परभणी, लातूर, उस्मानाबाद, वाशिम, अकोला, बुलडाणा, नांदेड, वर्धा, अमरावती, नागपूर, जालना, औरंगाबाद, या 15 जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
तर कोकणातील काही भागांत 6 ते 7 सप्टेंबर रोजी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आला आहे. ४-६ सप्टेंबर दरम्यान परत एकदा जोरदार पावसाची शक्यता IMD ने वर्तवली आहे. तर एकंदर संपूर्ण राज्यात याचा प्रभाव असण्याची शक्यता आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम