अहमदनगर Live24 टीम, 27 डिसेंबर 2021 :- मराठवाड्यात थंडीचा जोर वाढत होता, तर अनेक भागांत चांगलीच हुडहुडी भरलेली पाहायला मिळाली. दरम्यान, मागील दोन-तीन दिवसांत तापमानात हळूहळू वाढ होताना पाहायला मिळत आहे.(Weather Update)
दरम्यान, पुढील काही दिवसांत मराठवाड्यात परत पावसाची शक्यता हवामानतज्ज्ञांनी वर्तवली आहे. परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा
कृषी विद्यापीठातील ग्रामीण कृषी मौसम सेवा विभागाचे मुख्य प्रकल्प समन्वयक डॉ. के. के. डाखोरे यांनी मराठवाड्यात पुढील दोन ते तीन दिवस किमान तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही.
मात्र २८ डिसेंबर रोजी परभणी व हिंगोली जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वारा, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (तशी ३० ते ४० किलोमीटर) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची,
तर औरंगाबाद व जालना जिल्ह्यात वादळी वारा, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (तशी ३० ते ४० किलोमीटर) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची आणि तुरळक ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता असल्याचा
अंदाज वर्तवला आहे. शिवाय २९ डिसेंबर रोजी जालना, परभणी, हिंगोली व नांदेड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वारा, विजांचा कडकडाटासह, हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम