Chandra Grahan 2023 : वर्षातील शेवटच्या चंद्रग्रहणात चंद्रासारखं चमकणार 3 राशीच्या लोकांचं भाग्य, येणार ‘अच्छे दिन’

Ahmednagarlive24 office
Published:

Chandra Grahan 2023 : वर्षाचे शेवटचे चंद्रग्रहण सर्व 12 राशींवर चांगला तसेच वाईट परिणाम करणार आहे. दरम्यान, या वर्षातील शेवटचं चंद्रग्रहण हे 29 ऑक्टोबरला आहे. शनि आणि राहू केतू आपली स्थिती बदलणार आहे.

म्हणजे राहु मेष राशीतून मीन राशीत आणि केतूही तूळ राशीतून कन्या राशीत संक्रमण करेल. त्यानंतर 4 नोव्हेंबरला शनी स्वतःच्या कुंभ राशीत थेट फिरत असून आठवडाभरात ग्रहांच्या या बदलामुळे तीन राशींचं लोकांचे नशीब चंद्रासारखं चमकेल.

मिथुन रास

29 ऑक्टोबर रोजी होणारे चंद्रग्रहण मिथुन रास असणाऱ्या लोकांसाठी खूप चांगले मानले जाते. चंद्रग्रहणानंतर मिथुन रास असणाऱ्या लोकांना सूर्यदेवाची कृपा मिळेल असे सांगण्यात येत आहे. परिणामी त्यांना नोकरीमध्ये बढतीचा लाभ मिळू शकतो.

तसेच चंद्रग्रहणानंतरचा काळ नोकरी करणाऱ्यांसाठी वरदान ठरू शकतो. इतकेच नाही तर व्यवसाय करणाऱ्यांनाही या काळात मोठा नफा मिळेल. वैवाहिक जीवनात आनंद राहील. तुम्हाला फालतू खर्चावर देखील नियंत्रण ठेवता येईल.

कर्क रास

ज्योतिष तज्ज्ञांच्या मतानुसार, कर्क रास असणाऱ्या लोकांसाठी हे शुभ मानले जाते. तसे सांगायचे झाले तर 29 ऑक्टोबरला चंद्रग्रहणानंतरचा काळ लाभदायक ठरू शकतो. सूर्यदेवाच्या कृपेने नोकरी आणि व्यवसायात लक्षणीय प्रगती होऊ शकते.

अचानक आर्थिक लाभ होईल. इतकेच नाही तर कामाच्या ठिकाणी अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळू शकते. एकंदरीत चंद्रग्रहणानंतरचा काळ कर्क रास असणाऱ्या लोकांसाठी चांगला आहे, असे म्हणता येईल.

वृषभ रास

ज्योतिष तज्ज्ञांच्या मतानुसार, 29 ऑक्टोबर रोजी होणारे चंद्रग्रहण वृषभ रास असणाऱ्या लोकांसाठी खूप फायदेशीर सिद्ध होईल. या काळात सूर्यदेवाच्या कृपेने प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतात. हे चंद्रग्रहण करिअरच्या दृष्टिकोनातून फायदेशीर मानले जात असून चंद्रग्रहणानंतर व्यवसायात चांगली तेजी दिसून येईल. इतकेच नाही तर नोकरीत बढती होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. सूर्यग्रहणामुळे या राशीच्या लोकांना चांगले दिवस येतील.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe