WhatsApp feature : जर तुम्ही व्हॉट्सॲप वापरत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे, व्हॉट्सॲप आपल्या वापरकर्त्यांसाठी सतत जबरदस्त फीचर आणत असते.
अशातच व्हॉट्सॲपने आपल्या वापरकर्त्यांसाठी ग्रुप चॅटिंगसाठी नवीन फिचर आणले आहे. त्यामुळे आता अधिक मजेदार चॅटिंग होईल, यात काही शंकाच नाही.
स्क्रीनशॉटमध्ये दर्शविलेले नवीन फीचर
रिपोर्टनुसार, हे नवीन फीचर सध्या WhatsApp डेस्कटॉप बीटा व्हर्जन 2.2245.3 साठी आणले जात आहे. शेअर केलेल्या स्क्रीनशॉटमध्ये तुम्ही या फीचरची झलक पाहू शकता. तुम्ही व्हॉट्सॲप डेस्कटॉपचे बीटा व्हर्जन वापरत असाल तर हे फीचर तुमच्यासाठी उपलब्ध झाले आहे. तुमच्या डेस्कटॉप बीटा व्हर्जनवर हे फीचर एंटर केले नसल्यास, तुम्हाला आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागेल.
WhatsApp is releasing the ability to view profile photos within group chats!
Some beta testers that install the latest update of WhatsApp Desktop beta may be able to view profile icons within their group chats!https://t.co/WwosS3diMv
— WABetaInfo (@WABetaInfo) November 17, 2022
व्हॉट्सॲपच्या या नवीन फीचरमुळे यूजर्स अशा सदस्यांना ओळखू शकतील ज्यांचे नंबर कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये सेव्ह नाहीत. WABetaInfo ने म्हटले आहे की जर युजरला ग्रुप चॅटमध्ये सदस्याच्या प्रोफाईल फोटोऐवजी व्हॉट्सॲपचा डिफॉल्ट प्रोफाईल फोटो दिसला तर समजावे की समोरच्या व्यक्तीने प्रोफाईल फोटोसाठी तीच सेटिंग सेट केली आहे.
नवीन व्हर्जन लवकरच आणले जाईल
व्हॉट्सॲपचे हे फीचर सध्या बीटा यूजर्ससाठी आणले जात आहे. iOS साठी या बीटा आवृत्तीने आधीच iOS 22.23.0.70 मध्ये प्रवेश केला आहे. व्हॉट्सॲपने सध्या अँड्रॉईड रोलआउटबद्दल कोणतीही माहिती दिलेली नाही. डेस्कटॉप आवृत्तीवर चाचणी पूर्ण झाल्यानंतर कंपनी Android वापरकर्त्यांसाठी ते जारी करेल अशी अपेक्षा आहे.