Online Flight Booking : आता स्वस्तात करता येणार विमानाने प्रवास! ‘ही’ वेबसाइट करत आहे खूप कमी दराने तिकिटांची विक्री

Online Flight Booking : सध्या सणासुदीचे दिवस आहेत. अनेकजण या काळात आपल्या गावी जातात. गावी जाण्यासाठी काहीजण बस,रेल्वे तर काहीजण विमानाने प्रवास करत आहेत. परंतु, सणासुदीचे दिवस असल्यामुळे प्रत्येकाला सहजपणे वाहन उपलब्ध होईल असे नाही.

त्यात सर्व वाहनांना खूप गर्दी पाहायला मिळत आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रवासासाठी जास्त पैसे मोजावे लागत आहे. अशातच तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. तुम्ही आता विमानाने खूप स्वस्तात प्रवास करू शकता. होय, आता एका वेबसाइटवरून तुम्ही खूप कमी किमतीत तिकीट विकत घेऊ शकता. येथे 3,000 रुपयांपासून विमान तिकीट मिळत आहे.

स्वस्त तिकीट बुक करण्याची संधी

तुम्ही एका वेबसाइटवरून बाजारातील सर्वात स्वस्त फ्लाइट तिकीट बुक करू शकता, खरं तर या वेबसाइटचे नाव http://skyscanner.co.in असे आहे. जेव्हा तुम्ही या वेबसाईटवर जाऊन तुमच्या फ्लाइटची माहिती मिळवता, तेव्हा तुमच्यासमोर एक नाही तर बाजारातील सर्व फ्लाइटची माहिती तुमच्यासमोर दिसते.

तुम्हाला या ठिकाणी वेगवेगळ्या वेळा आणि वेगवेगळ्या क्षमतेच्या फ्लाइट्स दाखवण्यात येतात, ज्यामधून तुम्ही काही मिनिटांत तुमची आवडती फ्लाइट बुक करू शकता. तुम्हाला ज्या दिवशी प्रवास करायचा आहे तो दिवस सोडून तुम्ही फ्लाइट तिकीट बुक केली तर, त्यांच्या किमती इतक्या कमी आहेत की तुम्ही फक्त ट्रेनच्या खर्चावर फ्लाइट तिकीट बुक करत आहात असे तुम्हाला वाटू लागेल.

कसे चालते वेबसाइटचे काम

ही वेबसाइट तुमच्या माहितीनुसार मार्केटमधील सर्व फ्लाइट शोधते आणि त्यांची माहिती तुमच्यासमोर आणते. त्यापैकी बहुतांश फ्लाइट्स अशा आहेत ज्या सर्वात स्वस्त असून त्यांची संख्या सर्वात जास्त आहे. या वेबसाइटच्या मदतीने तुम्हाला सर्वात स्वस्त फ्लाइट तिकीट बुक करता येते.

 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe