Cheapest 5G Smartphone : प्रतीक्षा संपली ! अखेर लॉन्च झाला सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन ; किंमत आहे फक्त ..

Cheapest 5G Smartphone : भारतात मागच्या महिन्यात 5G सेवा सुरु करण्यात आली आहे. आता पर्यंत ही सेवा काही ठराविक शहरात सुरु झाली असून लवकरच संपूर्ण देशात सुरु होणार आहे. यामुळे आता अनेक जण 5G स्मार्टफोन खरेदीसाठी मार्केटमध्ये गर्दी करत आहे.

यातच आता भारतीय कंपनी Lava ने देखील आपला सर्वात सवस्त 5G स्मार्टफोन लॉन्च केला आहे. हा स्मार्टफोन आता पर्यंतचा सर्वात सवस्त स्मार्टफोन आहे. लावाने Lava Blaze 5G हा स्मार्टफोन लॉन्च केला आहे. याची किंमत 10 हजार पेक्षा कमी आहे. चला तर जाणून घ्या या स्मार्टफोनची फीचर्स.

Lava Blaze 5G ची फीचर्स

प्रोसेसर- कंपनीने हा फोन MediaTek Dimensity 700 प्रोसेसरसह सादर केला आहे. डिस्प्ले- या फोनला 6.5 इंच स्क्रीनचा HD + IPS डिस्प्ले मिळेल. फोनमध्ये 90Hz चा रिफ्रेश दर देखील देण्यात आला आहे.

कॅमेरा- लावाच्या या फोनमध्ये फ्लॅशसह 50 एमपी ट्रिपल एआय कॅमेरा सेटअप आहे. फोनमध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंगसाठी 2K फॉरमॅट उपलब्ध आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 8 एमपी फ्रंट कॅमेरा आहे.

रॅम आणि मेमरी- या फोनमध्ये 4 जीबी रॅम आणि 3 जीबी व्हर्च्युअल रॅम आहे. तर त्याच वेळी फोनमध्ये 128 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आले आहे. फोनमध्ये 1 TB पर्यंत एक्सपांडेबल मेमरीचा पर्यायही आहे.

बॅटरी- या फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. फोनमध्ये टाइप सी चार्जिंग देखील देण्यात आले आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, फोन 2 तास 50 मिनिटांत पूर्ण चार्ज होईल.

 

नेटवर्क- हा फोन 5G नेटवर्कसह 4G नेटवर्कवर काम करेल. कंपनीच्या मते, हा फोन 5G च्या सर्व भारतीय बँडवर चालेल. OS- हा फोन Android 12 सह लॉन्च करण्यात आला आहे.

इतर फीचर्स- या फोनमध्ये फिंगरप्रिंट सेन्सर, फेस अनलॉक, 3.5 मिमी जॅक यांसारखी सर्व फीचर्स आहेत. रंग- Lava Blaze 5G ग्लास ग्रीन आणि ग्लास ब्लू या दोन रंगांमध्ये येतो.

लावा ब्लेझ 5G किंमत आणि उपलब्धता

Lava ने आपला स्मार्टफोन Lava Blaze 5G Rs 9,999 च्या किमतीत लॉन्च केला आहे. हा फोन Amazon वरून खरेदी करता येईल.

हे पण वाचा :-  EPFO Update: आता UAN नंबर नसतानाही तपासता येणार PF खात्यातील शिल्लक ; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe