Cheapest Electric Car In India: देशात सध्या इलेक्ट्रिक कार्सचा क्रेझ झपाट्याने वाढत आहे. यामुळे भारतीय ऑटो बाजारात अनेक इलेक्ट्रिक येणाऱ्या नवीन वर्षात लाँच देखील होणार आहे. तुम्ही देखील नवीन इलेक्ट्रिक कार खरेदीचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे.
आम्ही तुम्हाला या बातमीमध्ये 2023 लाँच होणाऱ्या एका जबरदस्त इलेक्ट्रिक कारबद्दल माहिती देणार आहोत जे तुम्ही फक्त 5 लाख रुपयांपेक्षा कमी किमतीमध्ये खरेदी करू शकतात. तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या ही जबरदस्त इलेक्ट्रिक कार तुम्ही फक्त 10,000 रुपयांच्या टोकन रकमेवर बुक करू शकता. या इलेक्ट्रिक कारचा नाव Strom R3 आहे. ही कार ग्राहकांना एका चार्जवर तब्बल 200km रेंज देणार आहे. चला तर जाणून घ्या या जबरदस्त कारबद्दल संपूर्ण माहिती.
फीचर
Strom R3 च्या लुक आणि फीचर्सबद्दल सांगायचे तर, ही दोन- डोर सलेली डबल सीटर इलेक्ट्रिक कार आहे. त्याला तीन चाके आहेत. ऑटोमॅटिक ट्रान्समिशन असलेल्या या इलेक्ट्रिक कारमध्ये सनरूफ देखील आहे आणि तिची बूट स्पेस 300 लिटर आहे.
इतर फीचर्समध्ये कीलेस एंट्री, पॉवर विंडो, 7-इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले, व्हॉईस आणि जेश्चर कंट्रोल्स, जीपीएस नेव्हिगेशन, क्लायमेट कंट्रोल, पार्किंग असिस्ट आणि रिव्हर्स कॅमेरा यांचा समावेश आहे.
रेंज
जर तुम्ही Strom R3 ची बॅटरी आणि पॉवर बद्दल बोललो तर त्यात 48-व्होल्ट इलेक्ट्रिक मोटर आहे, जी 20.4 PS पर्यंत पॉवर आणि 90 न्यूटन मीटर टॉर्क जनरेट करण्यास सक्षम असेल. एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर ही इलेक्ट्रिक कार 200 किलोमीटरपर्यंत धावू शकते.
हे 120 किमी आणि 180 किमी बॅटरी रेंजसह वेरिएंटमध्ये लॉन्च केले जात असल्याच्या बातम्या आहेत. या इलेक्ट्रिक कारला पूर्ण चार्ज होण्यासाठी 3 तास लागतात आणि तिचा टॉप स्पीड 80 किलोमीटर प्रति तास आहे.
हे पण वाचा :- Multibagger Stock : बाबो.. ‘या’ 25 पैशांच्या शेअरने गुंतवणूकदारांना बनवले करोडपती ! जाणून घ्या संपूर्ण माहिती