Check Bank Balance Using Aadhaar : मागील काही वर्षांपासून आधार कार्ड (Aadhar Card) ही आपली ओळख बनली आहे. अनेक महत्वाच्या कामांसाठी (Work) आपल्याला आधार कार्डची गरज पडते.
आता याच आधारचा वापर करून तुम्ही तुमच्या खात्यातील रक्कम (Bank Balance Using Aadhaar) काही मिनिटात तपासू शकता.
आधार कार्डमध्ये पत्ता आणि जन्मतारीख यासारखी तुमची वैयक्तिक माहिती असते. आधार क्रमांक (Aadhaar Number) तुमच्या बोटांचे ठसे आणि डोळे स्कॅनसारख्या बायोमेट्रिक माहितीशी देखील जोडलेला आहे.
आधार कार्डमध्ये नावापासून पत्त्यापर्यंत सुधारणा करणे सोपे झाले आहे. तुम्हाला माहिती आहे का की तुमच्या खात्यात उपलब्ध रक्कम तपासण्यासाठी 12 अंकी आधार कार्ड नंबर देखील वापरला जाऊ शकतो.
हे फीचर तुम्हाला बँकेत (Bank) जाण्याच्या त्रासापासून वाचवते. UIDAI ची ही सेवा विशेषतः वृद्ध लोकांसाठी उपयुक्त आहे जे स्मार्टफोन (Smartphone) वापरत नाहीत.
ही सेवा इंटरनेट कनेक्शन नसलेल्या प्रकरणांमध्ये देखील उपयुक्त आहे. या सेवेसाठी चार सोप्या पायऱ्या आहेत.
आधार वापरून बँक बॅलन्स कसे तपासायचे
इंटरनेट कनेक्शन नसताना ही पद्धत विशेषतः उपयुक्त आहे. याशिवाय तुम्ही स्मार्टफोन तसेच फीचर फोनवर तुमची बँक बॅलन्स तपासण्यासाठी या तंत्राचा वापर करू शकता.
- सर्वप्रथम तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवरून *99*99*1# डायल करा.
- यानंतर 12 अंकी आधार क्रमांक टाका.
- नंतर तुमचा आधार क्रमांक सत्यापित करण्यासाठी तो पुन्हा प्रविष्ट करा.
- यानंतर UIDAI तुमच्या स्क्रीनवर फ्लॅश एसएमएस पाठवेल.
- फ्लॅश एसएमएस स्क्रीनवर तुमची बँक शिल्लक (Bank balance) दर्शवेल.
आधार कार्ड वापरून तुम्ही तुमच्या बँक खात्यातील शिल्लकसोबतच पैसे पाठवायला, सरकारी अनुदानासाठी अर्ज करायलाही त्याचा उपयोग होतो आणि पॅन कार्डसाठी अर्ज करण्यासारख्या इतर कामांसाठी देखील करू शकता.
आधार सेवा घरपोच दिली जाईल
मीडिया रिपोर्ट्समधून मिळालेल्या माहितीनुसार, युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया तुमचा फोन नंबर आधारशी लिंक करणे, इतर माहिती अपडेट करणे इत्यादी घरोघरी सेवा देण्यासाठी सज्ज आहे.
याचा लाभ घेण्यासाठी आता तुम्हाला आधार सेवा केंद्रावर जाण्याची गरज नाही. UIDAI सध्या 48,000 पोस्ट ऑफिस अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देत आहे. प्रशिक्षणानंतर, ते तुमच्या दारात आधार सेवा प्रदान करतील.
अहवालानुसार, 1.5 लाख टपाल अधिकाऱ्यांना 2 टप्प्यांत प्रशिक्षण दिले जाईल. अधिका-यांनी सांगितले की, पोस्टमनना ओळखीच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि त्यांना आधार कार्यक्रमात नोंदणी करण्यासाठी प्रशिक्षण दिले जाते, जो UIDAI च्या योजनेचा एक भाग आहे.