BSNL : दररोज 5 GB डेटा देणारा बीएसएनएलचा ‘हा’ प्लॅन एकदा बघाच, अमर्यादित कॉलिंगसह मिळणार बरंच काही

BSNL : भारत संचार निगम लिमिटेड म्हणजेच बीएसएनएल ही देशातील सर्वात मोठी सरकारी टेलिकॉम कंपनी आहे. कंपनी सतत Airtel आणि Reliance Jio यांसारख्या दिग्ग्ज कंपन्यांना टक्कर देते. कारण या कंपनीचे प्लॅन्स खूप स्वस्त असतात.

तसेच या कंपन्यांच्या तुलनेत बीएसएनएल जास्त फायदे देत असते. असाच बीएसएनएलचा एक प्लॅन आहे. ज्यात ग्राहकांना दररोज 5 GB इंटरनेट डेटा मिळत आहे. तसेच अमर्यादित कॉलिंगसह इतर फायदेही दिले जात आहे. याची वैधता 84 दिवसांची आहे.

कंपनीच्या या शानदार रिचार्ज प्लॅनची ​​किंमत 599 रुपये इतकी आहे. यात तुम्हाला एकूण 84 दिवसांची वैधता मिळत जर तुम्ही एकदा हा प्लॅन घेतला तर तुम्हाला 3 महिन्यांसाठी इतर कोणत्याही प्लॅनचे रिचार्ज करण्याची गरज पडणार नाही.

यात दररोज 5 GB डेली डेटा लिमिट मिळत आहे. त्यामुळे आता डेटा संपण्याचे टेन्शन नाही.

तसेच यात अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळत आहे. दररोज 100 एसएमएसची सुविधा मिळत आहे.

इतकेच नाही तर यामध्ये तुम्हाला अनलिमिटेड फ्री डेटा दिला जात आहे. तो तुम्ही मध्यरात्री 12 ते पहाटे 5 पर्यंत वापरू शकता. त्यामुळे जर तुम्ही इंटरनेट वापरासाठी एक चांगला रिचार्ज प्लॅन शोधत असाल तर हा प्लॅन तुमच्यासाठी उत्तम आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe