Cheque Payments : आजच्या काळात, सगळे लोक पेमेंट करण्यासाठी ऑनलाइन बँकिंगचा वापर करतात. पण असे असले तरी मोठी रक्कम एका बँकेतून दुसऱ्या बँकेत पाठवण्यासाठी आजही चेकचा वापर केला जातो. मात्र त्याचा वापर करताना काही विशेष काळजी घ्यावी लागते. चेक पेमेंट करताना रक्कम लिहिल्यानंतर त्याच्या मागे Only लिहावे लागते. पण तुम्हाला माहीत आहे का चेकच्या मागे Only लिहिणे महत्त्वाचे का आहे? आज आपण याबद्दलच जाणून घेणार आहोत.
‘Only’ लिहिण्याचे महत्व
अनेक वेळा लोक विचारतात की रकमेच्या नंतर ‘Only’ लिहिले नाही तर तुमचा चेक बाऊन्स होईल का? असे नाही, पण चेकवर रक्कम लिहिल्यानंतर Only हा शब्द लिहिल्याने तुमच्या चेकची सुरक्षा वाढते. यामुळे खात्यातील फसवणूक मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकते. त्यामुळे रक्कम लिहिल्यानंतर Only हा शब्द लिहिणे फार आवश्यक आहे.
Only न लिहिल्यास नुकसान होऊ शकते
तुम्ही चकेमध्ये रक्कम लिहिल्या नंतर Only लिहित नसाल आणि तुम्ही तो चेक दुसऱ्या दिला तर तो व्यक्ती त्याच्या पुढे कीतीही रक्कम लिहून अधिक पैसे काढू शकतो. यामुळे तुम्ही फसवणुकीला बळी पडू शकता. म्हणून कधीही रक्कम लिहिल्यानंतर Only हा शब्द नक्की लिहा.
दोन रेषा का काढल्या जातात?
चेक भरताना, वरच्या कोपऱ्यावर दोन रेषा टाकण्याची खात्री करा, याचा अर्थ खातेदार. म्हणजेच खात्यात जमा झालेले पैसे ज्या व्यक्तीच्या नावाने धनादेश काढला गेला आहे त्यालाच मिळणार आहे. म्हणून, अनेक वेळा लोक दोन ओळींमध्ये A/C Payee लिहितात. यामुळे चेक सुरक्षित होतो.