PF Balance Check : जर तुम्हाला तुमच्या पीएफमधील बॅलन्स चेक करायचा असेल तर तुम्ही आता तुमच्या मोबाईलवरुन सहज तो तपासू शकता. पीएफ बॅलन्स चेक करण्यासाठी आता वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत. या पद्धती वापरुन तुम्ही तुमचा पीएफमधील बॅलन्स काही मिनिटातच तपासू शकता.
या चार पर्यायांचा वापर करुन तुम्ही आता फक्त एकाच क्लिकवर आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्ही घरबसल्या तुमच्या पीएफ खात्यातील रक्कम किती आहे हे तपासू शकता. त्यासाठी तुम्हाला कोठेही जाण्याची गरज पडणार नाही. घरबसल्या तुमचे काम होऊ शकते.
फॉलो करा या स्टेप्स
स्टेप 1
खरं तर, तुम्हाला तुमच्या पीएफ खात्याची एकूण शिल्लक किती आहे हे जाणून घेण्याचा तुम्हाला अधिकार आहे. शिल्लक तपासण्यासाठी तुम्हाला सर्वात अगोदर एक नंबर डायल करून ज्यावर तुम्हाला मिस कॉल करायचा आहे. हे लक्षात ठेवा की तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावरून 011-22901406 या क्रमांकावर मिस्ड कॉल द्यावा लागणार आहे.
स्टेप 2
जेव्हा तुम्ही मिस्ड कॉल करताच तुमच्या थोड्याच वेळात मोबाईल नंबरवर EPFO कडून एक मेसेज येईल, ज्यात तुमच्या सध्याच्या बॅलन्सची माहिती देण्यात येते.
ऑनलाइन तपासता येते
जर तुम्हाला हवे असेल तर, तुम्ही तुमच्या घरबसल्या आरामात तुमच्या पीएफ खात्यातील शिल्लक ऑनलाइन तपासू शकता. यासाठी तुम्हाला EPFO च्या अधिकृत वेबसाइट passbook.epfindia.gov.in/MemberPassBook/Login वर जावे लागणार आहे. येथे भेट देऊन तुम्ही UAN क्रमांकाने लॉग इन करून तुमची सध्याची शिल्लक तपासू शकता.
उमंग अॅप
जर तुम्हाला हवे असेल तर, उमंग अॅप तुम्हाला पीएफ खात्यातील शिल्लक जाणून घेण्यासाठी खूप फायद्याचे ठरेल. या अॅपमध्ये तुम्हाला EPFO चा शॉर्टकट मिळतो, ज्याच्या मदतीने तुम्ही त्याच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊ शकता.