Skip to content
AhmednagarLive24

AhmednagarLive24

  • About Us
  • Advertising
  • Disclaimer
  • Contact us
  • Corrections Policy

PF Account : पीएफ बॅलन्स तपासणे झाले सोपे ! घरबसल्या मोबाईलवर अशी तपासा शिल्लक रक्कम

Saturday, December 17, 2022, 1:59 PM by Ahilyanagarlive24 Office

PF Account : सरकारी किंवा खाजगी नोकरी करत असताना अनेकांच्या पगारातील काही रक्कम पीएफ म्हणून कापली जाते. तसेच या रकमेवर ईपीएफ कडून व्याज देखील दिले जाते. मात्र ही रक्कम तपासण्यासाठी अगोदर बँकेत जावे लागायचे मात्र आता घरबसल्याही ही रक्कम तपासता येऊ शकते.

सरकारद्वारे चालवल्या जाणाऱ्या योजनेत EPF देखील आहे. या योजनेद्वारे नोकरदार लोकांची बचत वाढली आहे. त्याच वेळी, लोकांना ईपीएफ खात्यात व्याज देखील दिले जाते. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) भविष्य निर्वाह निधी (PF) खात्यांमध्ये व्याज जमा करते.

आर्थिक वर्ष 2021-22 साठी पीएफ खात्यातील गुंतवणुकीवर 8.1% व्याजदर आहे. EPFO च्या सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीज (CBT) मार्फत वित्त मंत्रालयाशी सल्लामसलत करून पीएफचा व्याज दर दरवर्षी निश्चित केला जातो. ईपीएफओने या वर्षी जूनमध्ये व्याजदराची घोषणा केली होती.

पीएफ शिल्लक तपासा

एकदा व्याज जमा झाले की, व्यक्ती त्याच्या पीएफ खात्यातील व्याजाची रक्कम पाहू शकते. यासोबतच त्याच्या खात्यात आतापर्यंत जमा झालेली रक्कमही तपासता येईल.

पीएफ खात्यातील शिल्लक अनेक प्रकारे तपासली जाऊ शकते. पीएफ खात्यांमध्ये जमा केलेली रक्कम ऑनलाइन किंवा एसएमएसद्वारे तपासली जाऊ शकते.

एसएमएसद्वारे पीएफ खात्यातील शिल्लक तपासा

1. जर तुम्हाला पीएफ खात्यात जमा झालेली रक्कम एसएमएसद्वारे तपासायची असेल, तर तुम्हाला EPFOHO UAN ENG लिहून 7738299899 वर एसएमएस पाठवावा लागेल.
2. एसएमएसमध्ये लिहिलेली शेवटची तीन अक्षरे तुमची पसंतीची भाषा दर्शवतात. येथे ENG म्हणजे इंग्रजी. इंग्रजी, हिंदी, तमिळ, मराठी, बंगाली, कन्नड, पंजाबी, तेलुगु, मल्याळम आणि गुजराती अशा एकूण 10 भाषांमधून तुम्ही निवडू शकता.
3. यामध्ये हिंदीसाठी HIN, पंजाबीसाठी PUN, गुजरातीसाठी GUJ, मराठीसाठी MAR, कन्नडसाठी KAN, तेलुगूसाठी TEL, तमिळसाठी TAM, मल्याळमसाठी MAL आणि बंगालीसाठी BEN पाठवावे लागणार आहेत.
4. युनिव्हर्सल अकाउंट नंबर (UAN) वर नोंदणीकृत असलेल्या मोबाईल नंबरवरून एसएमएस पाठवावा लागेल.
EPFO तुमचे शेवटचे पीएफ योगदान, शिल्लक तपशील आणि उपलब्ध KYC तपशील तुमच्या मोबाइल नंबरवर एसएमएसद्वारे पाठवेल.

Categories ताज्या बातम्या Tags PF Account
Bike Rules : या प्रकारच्या मोटारसायकली पाहताच पोलीस करतात दंड, घराबाहेर पडण्यापूर्वी जाणून घ्या…
Driving Without DL : मस्तच ! आता ड्रायव्हिंग लायसन्स नसले तरीही होणार नाही कोणताही दंड, फक्त करा ही गोष्ट…
© 2025 AhmednagarLive24 • Built with GeneratePress