Maharashtra : कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी आता जरा तोंडावर आवर घालावा अन्यथा… राज ठाकरेंचा इशारा

Published on -

Maharashtra : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरून राज्यात चांगलेच रान पेटले आहे. शिंदे-फडणवीस सरकारवर विरोधी पक्षाकडून जोरदार टीका केली जात आहे तर कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनाही इशारा देण्यात येत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना इशारा दिला आहे.

राज ठाकरे म्हणाले, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी आता जरा तोंडावर आवर घालावा आणि हा प्रश्न चिघळू देऊ नये. महाराष्ट्राच्या गाड्यांची तोडफोड, तिथल्या मराठी माणसांना त्रास असले प्रकार सुरु आहेत ते तत्काळ थांबवा असा इशारा राज ठाकरे यांनी दिला आहे.

पुढील वर्षी होणाऱ्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्राचा नाहक छळ केला जात आहे, असे सांगत राज ठाकरे यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांना तोंड बंद ठेवावे आणि प्रक्षोभक वक्तव्ये करणे टाळावे, असा इशारा दिला आहे.

सीमाभागातील वाहनांवर आणि मराठींवर होणारे हल्ले त्वरित थांबवावेत, अशी मागणी करत राज ठाकरे म्हणाले की, सीमावाद चर्चेतून सोडवला गेला पाहिजे, पण गरज पडल्यास मनसेचे कार्यकर्ते प्रत्युत्तर देण्यास कोणत्याही प्रकारे मागे हटणार नाहीत.

राज ठाकरे म्हणाले, मी मध्यंतरी बोललो तसे, महाराष्ट्र-कर्नाटकाचा सीमावाद उफाळून यावा, ह्यासाठी पुन्हा कोणाकडून तरी प्रयत्न सुरु झाले आहेत.

तिकडून कोण खतपाणी घालतंय हे तर उघड दिसत आहे. पण इथे कोण ह्याला खतपाणी घालत आहे का? हे सरकारने पहायला हवे. असेही राज ठाकरे म्हणाले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe