अहमदनगर Live24 टीम, 10 ऑगस्ट 2021 :-मुख्यमंत्री ठाकरे यांची टास्क फोर्ससोबतची बैठक काल उशिरा झाली मात्र या बैठकीत मंदिरं, मॉल तसेच रेस्टॉरंट यांना लागू असलेल्या निर्बंधांच्या शिथिलीकरणाबाबत कोणताही निर्णय झाला नाही.
तसेच मागिल वर्षीप्रमाणेच याही वर्षी सणांचे स्वरुप साधे असेल असे या बैठकीत ठरवण्यात आल्याची माहिती आहे. याव्यतिरिक्त कोरोनाची तिसरी लाट,
ऑक्सिजनची उपल्बधता तसेच लसीकरणावर या बैठकीत चर्चा करण्यात आली येत्या 15 ऑगस्टपासून मुंबई लोकमधून सामान्यांना प्रवास करता येणार आहे.
प्रवास करण्यासाठी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेले असणे आवश्यक असल्याची अट घालण्यात आली आहे. याच धर्तीवर राज्यातील मंदिरं तसेच रेस्टॉरंट आणि मॉल सुरु करण्याचा राज्य सरकारचा विचार आहे, अशी चर्चा आहे.
येत्या काही दिवसांमध्ये यावर निर्णय होण्याची शक्यता आहे. मात्र, मुख्यमंत्री आणि टास्क फोर्समध्ये झालेल्या बैठकीत या बाबींवर कोणताही निर्णय झालेला नाही. याव्यतिरिक्त हॉटेल्स आणि दुकानांची वेळ वाढवून देता येईल का यावर आजच्या बैठकीत चर्चा झाली आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम