मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यातील जनतेशी रात्री 8.30 वाजता संवाद साधणार

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 13 एप्रिल 2021 :-आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जनतेशी संवाद साधणार आहेत. उद्धव ठाकरे आज रात्री सोशल मीडियाच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत.

महाराष्ट्रात आज-उद्या कधीही लॉकडाऊनची घोषणा होऊ शकते. त्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे नेमकं काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

महाराष्ट्रातील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यातील जनतेशी संवादामध्ये काय बोलणार याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे.

उद्धव ठाकरे रात्री 8.30 वाजता राज्यातील जनतेशी संवाद साधतील राज्यासमोर कोरोनाची साथ हे सर्वात मोठं संकट सध्या आहे.

या संकटाशी सामना करण्यासाठी राज्याकडून केल्या जाणाऱ्या उपाय योजनांविषयी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलू शकतात अशी शक्यता आहे.

तर सर्वात मोठी शक्यता आहे, राज्यात लॉकडाऊनची घोषणा होण्याविषयी. राज्यात लॉकडाऊनची घोषणा झाली तर लॉकडाऊन कधी होईल.

लॉकडाऊन विषयी नेमक्या गाईडलाईन्स काय असतील. याविषयी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे बोलतील अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

कारण प्रशासकीय स्तरावर लॉकडाऊनची मोठ्या प्रमाणात तयारी आणि आराखडा बनवला जात असल्याचं सांगण्यात येत आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe