Chinese Smartphone Ban : भारतात (India) सध्या Xiaomi, Vivo, Oppo, Poco, Redmi आणि Realme या चिनी मोबाईल कंपन्यांचे (Chinese mobile companies) वर्चस्व आहे. परंतु, या कंपन्यांवर मोठी कारवाई करण्यात येणार आहे.
यामध्ये 12,000 रुपयांपेक्षा कमी किंमत असणाऱ्या चिनी स्मार्टफोनवर(Smartphone) भारतात बंदी घालण्यात येणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सरकारच्या या निर्णयामुळे Xiaomi, Vivo, Oppo, Poco, Redmi, Realme सारख्या कंपन्यांना मोठा झटका बसला आहे, जरी या प्रकरणी सरकार किंवा कोणत्याही चीनी कंपनीकडून अद्याप कोणतेही अधिकृत विधान आलेले नाही.
सरकारच्या या निर्णयामागे एंट्री लेव्हल सेगमेंटमध्ये देशांतर्गत कंपन्यांचे वर्चस्व प्रस्थापित करणे हा आहे. भारत सध्या जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी स्मार्टफोन बाजारपेठ आहे, परंतु चिनी कंपन्यांचा कब्जा आहे. या चिनी कंपन्यांपुढे देशांतर्गत कंपन्या टिकू शकत नाहीत.
मार्केट रिसर्च फर्म काउंटरपॉईंटच्या मते, जून 2022 पर्यंतच्या तिमाहीत भारताच्या विक्रीपैकी $150 पेक्षा कमी स्मार्टफोनचा वाटा एक तृतीयांश होता आणि शिपमेंटमध्ये 80% वाटा चिनी कंपन्यांचा आहे.
सरकारच्या या निर्णयाचा सॅमसंग आणि ॲपलला (Apple) मोठा फायदा होणार आहे. सॅमसंग आपले स्मार्टफोन सतत मिडरेंज आणि एंट्री लेव्हलमध्ये देऊ शकते, तर Apple देखील मिडरेंजमध्ये पुढे जाऊ शकते.
Vivo, Oppo आणि Xiaomi सारख्या कंपन्या आधीच आयकर विभागाच्या निशाण्यावर आहेत. या कंपन्यांवर करचुकवेगिरीचे आरोपही आहेत. अलीकडेच या कंपन्यांवर ईडीचे छापेही पडले आहेत.
349 चीनी ॲप्सवर बंदी
याआधी 2020 मध्ये सरकारने एकावेळी सुमारे 60 चायनीज ॲप्सवर बंदी घातली होती आणि त्यानंतर अनेक वेळा चायनीज ॲप्सवर बंदी घालण्यात आली होती. आतापर्यंत 349 चीनी ॲप्सवर बंदी घालण्यात आली आहे.
अलीकडेच, सरकारच्या आदेशानंतर PUBG चा नवीन अवतार Battlegrounds Mobile India Google Play-store आणि Apple च्या ॲपवरून काढून टाकण्यात आला आहे.
बॅटलग्राउंड मोबाईल इंडियाला स्टोअरमधून काढून टाकण्याबाबत कंपनीने म्हटले आहे की, ॲपवर कायमस्वरूपी बंदी घालण्यात आलेली नाही, परंतु ते तात्पुरते ब्लॉक करण्यात आले आहे. ॲप लवकरच परत येईल.