अहमदनगर Live24 टीम, 25 जून 2021 :- कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता जिल्ह्यातील नागरिकांमध्ये कोरोना विरुद्ध लढण्यासाठी अॅण्टीबॉडीज विकसित झाल्यात किंवा नाही, याची चाचणी करण्यासाठी शुक्रवारपासून सिरोसर्वे केला जाणार आहे.
जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी तालुकास्तरीय यंत्रणांशी दूरदृश्यप्रणालीद्वारे संवाद साधून कोरोना उपाययोजना बाबत मार्गदर्शन केले.
त्यावेळी ते बोलत होते. नोडल अधिकारी उपजिल्हाधिकारी उर्मिला पाटील, पल्लवी निर्मळ, रोहिणी नऱ्हे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉ. विरेंद्र बडदे हे जिल्हा मुख्यालय तर उपविभाग,
तालुकास्तरावरील महसूल, पोलीस, ग्रामविकास, आरोग्य आणि नगरविकास विभागाचे अधिकारी दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.
नागरिकांनीही आजाराची लक्षणे जाणवल्यास तत्काळ जवळच्या कोविड केअर सेंटरमध्ये दाखल होऊन उपचार घ्यावेत.
यापैकी कोणी बाधित आढळल्यास त्यांनी त्यांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांची नावे आरोग्य यंत्रणेला दिल्यास तात्काळ त्यांच्या चाचण्या करुन कोरोना संसर्ग साखळी तोडण्यास निश्चितपणे मदत होईल. असे त्यांनी स्पष्ट केले.
जिल्ह्यातील नागरिकांत कोरोना विषाणू विरु्ध लढण्यासाठी अॅण्टीबॉडीज तयार झाल्यात किंवा नाहीत,
याचा अभ्यास करण्यासाठी उद्यापासून जिल्ह्यात भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या वतीने सिरोसर्वे केला जाणार आहे. जिल्ह्यातील गावांतील आणि विविध वयोगटातील ४०० जणांची चाचणी केली जाणार आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम