कोरोनाच्या लाटेवर नियंत्रण मिळवण्यासाठी नागरिकांचे सहकार्य महत्वाचे – पोलीस अधीक्षक मनोज पाटील

Updated on -

अहमदनगर Live24 टीम, 10 जानेवारी 2022 :- कोरोनाच्या आलेल्या या लाटेवर नियंत्रण आणण्यासाठी नागरिकांचे सहकार्य अत्यंत महत्वाचे आहे. मात्र कोरोना अनुषंगिक नियम न पाळणारे,

पाच पेक्षा अधिकच्या संख्येने एकत्र असणारे अथवा फिरणारे नागरिक तसेच नाईट कर्फ्युत अत्यावश्यक/वैद्यकीय कारण नसताना फिरणाऱ्या नागरिकांवर पोलीस कारवाई करतील.

याबाबतच्या सर्व सूचना नगर शहरासह जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांना कळवण्यात आलेल्या आहेत. राज्यात आज मध्यरात्री 12 वाजेपासून कोरोनाच्या वाढत्या प्रादूर्भावामुळे राज्य सरकारने मिनी लॉकडाऊनची घोषणा केली आहे.

त्या अनुषंगाने सकाळी पाच ते रात्री अकरा वाजे पर्यंत जमावबंदी तर रात्री अकरा ते पहाटे पाच पर्यंत नाईट कर्फ्यु लागू केला आहे.

शासनाने दिवसां जमावबंदी तर रात्री नाईट कर्फ्यु लागू केला असल्याने जिल्हा पोलीस दलाचेही काम वाढले आहे. विशेष करून नाईट कर्फ्युत अनावश्यक फिरणाऱ्या नागरिकांना चाप लावणे,

उशिरा पर्यंत सुरू असणारे हॉटेल्स-बार वर निर्बंध आणणे या कडे लक्ष द्यावे लागणार आहे.नियम मोडणाऱ्यांवर पोलीस कारवाई करतील असे त्यांनी सांगितले.

आम्हाला कारवाई करावी अशी इच्छा नसते मात्र अत्यावश्यक,वैद्यकीय कारणानं शिवाय सोडून इतर दुकाने, आस्थापना यांनी शासनाने जारी केलेल्या वेळा आणि नियम पाळले पाहिजेत,

अन्यथा पोलिसां नियमानुसार कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याची माहिती पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली आहे.

मनपा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रशासनाला गर्दी जमू नये, नागरिक कोरोना अनुषंगिक नियमांचे पालन होतंय का या गोष्टींवर लक्ष ठेवावे लागणार आहे.

या साठी दुसऱ्या लाटेत कार्यान्वित करण्यात आलेली दक्षता पथकां कडून लक्ष ठेवावे लागणार आहे. रात्री नाईट कर्फ्युचे पालन नागरिक करतात की नाही हे ही पाहावे लागणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe