नगरचे संपर्कप्रमुख, पुण्याचे पालकमंत्री, भाजपचा बडा नेता राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात?

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar News

Maharashtra News:शिवसेना फोडल्यानंतर आता भाजपने राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्याला सुरूंग लावण्याची तयारी सुरू केली आहे. त्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पक्षातर्फे नगरच्या संपर्कप्रमुख पदाची जबाबादारी देताना पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणूनही निवड करण्याचा विचार असल्याचे सांगण्यात येते.

नगर व पुणे या पट्ट्यात राष्ट्रवादीचा वरचष्मा आहे. त्यामुळे भाजपने येथे पूर्वीपासून लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळे नगरसह सोलापूरची जबाबदारी यापूर्वीच फडणवीस यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.

मधल्या काळात शिवसेनेत बंडखोरी होऊन भाजपीचीही सत्ता आली. त्यामध्ये फडणवीस उपमुख्यमंत्री आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे आता पुणे जिल्ह्याची पालकमंत्रीपदाची जबाबदारी सोपविण्याचे घाटत आहे.

त्यामुळे पुणे, पिंपरी चिंचवड या प्रमुख महापालिकांसह जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही राष्ट्रवादीला शह देणे सोपे होईल. तेथे पवारांच्या बारामतीमध्येही अधिकृतपणे धडक मारता येईल, असा भाजपचा विचार सुरू असल्याचे सांगण्यात येते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe