ढगाळ हवामान पिकांना त्रासदायक ; रोगराई वाढण्याची शक्यता

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 23 जानेवारी 2022 :- गेल्या काही दिवसापासून ढगाळ हवामान निर्माण झाल्याने पिकांवर रोगराईचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्‍यता शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

सततच्या बदलत्या हवामानामुळे उत्पादक खर्चात होत असल्याने वाढीमुळे शेतकरी वर्ग अडचणीत सापडला आहे. दरम्यान नवीन वर्षाच्या सुरुवातीपासूनच ढगाळ हवामान व धुके पडल्यामुळे पिकांवर रोगराईच्या प्रमाणात वाढ झालेली दिसू लागली आहे.

त्यानंतर गेल्या पंधरा दिवसांपासून तिसर्‍यांदा मोठ्या प्रमाणात धुके पडल्यामुळे शेतामधील हरभरा, गहू, कांदे इतर पालेभाज्या व जनावरांसाठी उपयुक्त असणार्‍या घासाच्या पिकावर या पडलेल्या ढगाळ हवामानामुळे व धुक्यामुळे मावा पडल्याचे दिसून आले आहे.

यामुळे शेतकर्‍यांमध्ये फवारणी करताना धावपळी होत आहेत. करोना या महामारीतून बळीराजा कसाबसा बाहेर निघत असताना अशा एक ना अनेक संकटांना सध्या शेतकरी वर्ग सामोरा जात आहे.

द्राक्ष, डाळिंब यासारख्या पिकांवरही मोठ्या प्रमाणात फळांवर डाग व टिपके सध्या दिसून येत आहेत. याचा मोठा फटका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील सर्वच घटकांना बसत आहे.

खर्च जास्त व उत्पन्न कमी अशी काहीशी अवस्था सध्या शेतकर्‍यांवर सध्या आलेली पहावयास मिळत आहे. सतत बदलत असलेल्या हवामानामुळे शेतकऱ्यांच्या पिकांवर रोगराईचा प्रादुर्भाव होऊ लागला आहे.

त्यामुळे शेतकरी महागडी औषधांची खरेदी करून पिकांवर फवारणी करत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe