मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्यविकास प्रशिक्षण कार्यक्रमास जिल्ह्यात सुरुवात

Ahmednagarlive24
Published:

हमदनगर Live24 टीम, 8 जुलै 2021 :-कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य क्षेत्रात लागणाऱ्या कुशल मनुष्यबळाची गरज पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्यविकास प्रशिक्षण कार्यक्रमाचा शुभारंभ आज करण्यात आला.

राज्यात या योजनेचा शुभारंभ मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते दूरदृश्यप्रणालीद्वारे करण्यात आला. अहमदनगर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात जिल्ह्यातील या प्रशिक्षण कार्यक्रमास सुरुवात झाली.

जिल्हा सामान्य रुग्णालय येथे या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना प्रशिक्षण साहित्य,

सॅनिटायझर, मास्क आदींचे वाटप करण्यात आले. यावेळी अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. जमदाडे, डॉ. रामटेके, डॉ.शरद खटके,

मुख्य ट्रेनर डॉ. दर्शना बारवकर, कौशल्य विकास, उद्योजकता व रोजगार विभागाचे सहायक आयुक्त वि.ज. मुकणे यांच्यासह जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर्स, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी पहिल्या बॅचमध्ये २० जणांची निवड करण्यात आली आहे. आरोग्य सुविधा बळकट करण्यासाठी आणि आपत्कालिन परिस्थितीत आरोग्य क्षेत्रात आवश्यक कामकाज करण्यासाठी कुशल मनुष्यबळाची गरज लागते. ही गरज अशा प्रशिक्षणातून पूर्ण होणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe